रामचरण हे नाव कोणत्याही प्रेक्षकवर्गासाठी नवीन नाही. दाक्षिणात्य कलाविश्वासह बॉलिवूडमध्येही रामचरण हे नाव प्रसिद्ध आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी  यांचा लेक असलेल्या रामचरण याने ‘जंजीर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यामुळे त्याचं बॉलिवूडसोबतही एक नातं तयार झालं आहे. विशेष म्हणजे त्याच्या आगामी RRR या चित्रपटातही त्याच्यासोबत काही बॉलिवूड कलाकार स्क्रीन शेअर करणार आहेत.त्यामुळे रामचरण आणि बॉलिवूड कलाकारांचं चांगलं बॉण्डिंग निर्माण झाल्याचं दिसून येतंय. परंतु, बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान याच्यासोबत रामचरण यांची खास मैत्री आहे. विशेष म्हणजे अनेकदा भाईजानच्या घरुन रामचरणसाठी जेवणाचा डब्बाही जातो. अलिकडेच एका मुलाखतीत रामचरण याने या गोष्टींचा खुलासा केला आहे.

अधिक वाचा  "ज्याची बायको पळते त्याला.....", नाना पटोलेंचं पुन्हा वादग्रस्त विधान

“मी, सलमान खानच्या खूप क्लोज आहे. कारण सलमान आणि माझ्या वडिलांनी थम्स अपच्या जाहिरातीमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यावेळी मी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो. तेव्हापासून आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा मुंबईत येतो त्यावेळी ते मला घरची आणि कुटुंबीयांची उणीव भासू देत नाहीत. मी मुंबईत कुठेही असलो तरीदेखील ते दररोज माझ्यासाठी लंच आणि डिनरसाठी जेवणाचा डब्बा पाठवतात”, असं रामचरण म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्या सगळ्या क्रू मेंबर्ससाठीही ते जेवण पाठवतात. त्यांचं हे प्रेम मला पार भारावून टाकतं. एखाद्याची काळजी घेण्याची त्यांची पद्धतच वेगळी आहे. ते इतके मोठे अभिनेता असूनही खूप सहृदयी आहेत. निस्वार्थपणे ते एखाद्यासाठी करत असतात. त्यांच्यासारखं कोणीच नाहीये.”

अधिक वाचा  'जय भीम' ठरला ऑस्करच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट

दरम्यान, सलमान आणि चिरंजीवी यांच्यात चांगली मैत्री आहे. त्यामुळेच चिरंजीवी यांचा लेक रामचरण मुंबईत आल्यानंतर सलमान त्याची काळजी घेतो. रामचरण याचा बहुप्रतिक्षीत ठरत असलेला RRR हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एस.एस. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण आणि आलिया भट्टदेखील स्क्रीन शेअर करणार आहेत.