मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुरक्षेतील काही अडचणींमुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून त्यांना दिल्लीमध्ये पुन्हा जावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा केल्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत आता अहवाल मागवला आहे.

या घटनेमुळे आता राजकीय वर्तुळात वाद पेटला आहे. त्यातच आता भाजपकडून कॉंग्रेसवर वारंवार टीका होत आहेत. भाजप आणि काँग्रेस यांच्यात सध्या चांगलाच भडिमार होत आहे. याचदरम्यान आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले थेट अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

नाना पटोले यांनी सुरक्षेच्या त्रुटीमागे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर थेट संशय व्यक्त केला आहे. या घटनेत अमित शाह यांचा तर हात नाही ना असा सवाल त्यांनी केला आहे.

अधिक वाचा  UP Election: ‘सवर्ण विरुद्ध मागास’ असेल तर भाजपला धोक्याची घंटा?

एक नाहीतर तीन – तीन केंद्रीय गुप्ततर यंत्रणा आहेत. या सगळ्या गोष्टींची आधी माहिती घेतली जाते. हे सगळं केंद्रीय गृहखात्याच्या नियंत्रणाखाली असत त्यामुळे ही जी घटना घडली आहे त्यात पंजाब सरकार ला दोषी ठरवू नये असे ते यावेळी म्हणाले.

अश्या पद्धतीच नाटक तयार करून निवडणुका जिंकता येत नाही. भाजप अशी नाटक करण्याचा प्रयत्न करत आहे. खरतर या घटनेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा तर हात नाहीय ना? हा प्रश्न आता निर्माण होतं आहे. असे नाना पटोले यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांचा कुठेही दौरा असेल तर 15 दिवस आधी सर्व सुरक्षा केली जाते. सर्व सुरक्षा एसपीजी यांच्या कंट्रोलवर असते. एसपीजी हे गृहखात्यांतर्गत येतात त्यामुळे चूक पंजाब सरकारची आहे.

अधिक वाचा  काँग्रेसची मोठी घोषणा; उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला निवडणुकीचे तिकीट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या सुरक्षा यंत्रणाचे प्रमुख असतात. त्यामुळे पंतप्रधानाच्या सुरक्षेच्या त्रुटीबाबत गृहमंत्री अमित शाह यांनीच उत्तर द्यावे अशी मागणी नाना पटोले यावेळी बोलताना केली.

चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा

भाजपची सत्ता गेल्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे संतुलन बिघडलेले दिसत आहे. त्यांनी वारंवार आम्हाला तोंड उघडायला लाऊ नये. पोकळ इशारे देण्यापेक्षा त्यांनी एकदाच तोंड उघडून तोंडात हवा किती आहे ते संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला दाखवावे अश्या शब्दांत त्यांनी चंद्रकांत पटगिळ यांच्यावर निशाणा साधला आहे.