पुणे – देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे, उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे; तसेच सर्व प्रकारच्या संकटाना सामोरे जाण्याची ताकद त्यांना मिळावी, याकरीता आज भारतीय जनता पार्टी कोथरूड मतदारसंघातर्फे मृत्युंजय मंदिर येथे आरती व महामृत्युंजय जापाचे पठण करण्यात आले. यावेळी मा.केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर, महापौर मा. मुरलीधरजी मोहोळ यांची प्रमुख उपस्थित होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना काँग्रेस सरकारने पाकिस्तान सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर माननीय मोदींच्या मार्गावर आंदोलकांना पाठवून घातपाताचे एक षडयंत्र रचले. या घटनेचा संपूर्ण देशात निषेध करण्यात येत आहे. तसेच पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्यावरील सर्व आरिष्ठे टळावित आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी देशाच्या विविध भागात विविध धार्मिक अनुष्ठान, व्रत केले जात आहे.

अधिक वाचा  एसटी कर्मचारी संप बेकायदेशीर - कामगार न्यायालय

त्याअनुषंगाने भारतीय जनता पार्टी मंडलाच्या वतीने माननीय नरेंद्र मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी महामृत्युंजय जप अनुष्ठान आयोजिले होते. सदर अनुष्ठानास माजी केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती‌.

या अनुष्ठानानंतर पंजाबमधील काॅंग्रेस सरकारचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करताना माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान एखाद्या ठिकाणी 20 मिनिट अडकून राहणे ही सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय निंदनीय बाब आहे. तसेच आपल्या एका सहकार्याला कोरोनाची लागण झाली असल्याने मा.पंतप्रधनांसोबत उपस्थित राहू शकलो नाही असे कारण पंजाब चे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी दिले, पण त्याच वेळी ते मास्कशिवाय पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले, काँग्रेस च्या बैठकीतही ते गेले यावरून अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण काँग्रेस करत आहे हे स्पष्ट होते आहे.”

अधिक वाचा  लैंगिक संबधांमुळे आरोग्य सुधारतं का? 10 सोप्या मुद्द्यात जाणून घ्या

या वेळी भाजपा मतदारसंघाचे अध्यक्ष मा. पुनीतजी जोशी यांच्या समवेत मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी,नगरसेवक,लोक प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.