मुंबई: काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमायक्रॉन व्हेरिएंटनं जगभर थैमान घातलं आहे.याच पार्श्वभूमीवर अनेक देशात बूस्टर डोस दिले जात आहे. बूस्टर डोस भारतातही देण्यात येणार आहे. येत्या 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. या बूस्टर डोस देण्यासंदर्भात मुंबई महापालिकेनं नियमावली जाहीर केली आहे.

बूस्टर डोससंदर्भातली BMC ची नियमावली

येत्या 10 जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येणार

आरोग्य कर्मचारी, कोव्हिडमध्ये आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि 60 वर्ष आणि त्यावरील नागरिकांना बूस्टर लसीचा डोस देणार वरील सर्व जण दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असल्यास तिसऱ्या डोससाठी पात्र असतील.

अधिक वाचा  सर्व मंत्रालयांच्या महत्त्वाच्या बैठकीत स्मार्टवॉच आणि स्मार्टफोनवर बंदी

ऑनलाईन आणि नोंदणी पद्धतीनं सुविधा उपलब्ध असेल.

60 वर्ष आणि त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना तिसरा डोस देताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवायची आवश्यकता नाही. मात्र अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा.

सर्व नागरिकांना सरकारी केंद्रावर लसीकरण विनामूल्य होणार

जर वरील कोणत्याही नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असल्यास केंद्र सरकारने घोषित केलेल्या किंमतीत लस घ्यावी लागेल.

आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्धे ज्यांचे वय 60 पेक्षा कमी आहे आणि ज्यांची कोविन ॲपवर नागरिक अशी वर्गवारी झाली आहे अशा लाभार्थ्यांना लसीकरण फक्त सरकारी लसीकरण केंद्रात ऑनसाइट पद्धतीने उपलब्ध असेल.

अधिक वाचा  मोबाईलवरुन 2 वर्षाच्या मुलाने केला कारनामा, पालक झाले थक्क

त्याकरिता नागरिकांनी नोकरीच्या ठिकाणाचे प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र सादर करणं बंधनकारक असणार आहे.

निती आयोगाचे सदस्य व्ही. के.पॉल यांनी स्पष्ट केलं की, कोरोना लसीचे दोन डोस घेतले असतील तीच लस बूस्टर डोससाठी घेता येईल. म्हणजेच कोव्हॅक्सिन लसीचे पहिले दोन डोस घेतले असतील त्यांना बूस्टर डोसही कोव्हॅक्सिनचाच दिला जाईल. तसंच कोव्हिशिल्डचे दोन डोस घेतले असतील, त्यांना बूस्टर डोस कोव्हिशिल्ड लसीचाच दिला जाईल.