पत्रकारदिना निमित्त वारजे परिसरातील सन्माननीय पत्रकार बंधु-भगिनीचा सन्मान विरोधीपक्ष नेत्या सौ दिपालीताई प्रदीप धुमाळ व प्रदीप उर्फ बाबा धुमाळ यांच्या वतीने करण्यात आला. प्रत्येक घटनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार बांधव करत असतात. पत्रकार बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता देशातील प्रत्येक घडामोडीबद्दल सविस्तर माहिती पोहोचवतात. अशा या धाडसी पत्रकारितेला आणि हे काम अगदी निष्ठेने पार पाडणा-यांचा सन्मान करण्यासाठी आजच्या विक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रदीप उर्फ बाबा धुमाळ यांनी सांगितले

महादेव पवार, सचिन सिंग, बजरंग लोहार, प्रदीप बलाढे, अमोल साबळे, विनायक बेदरकर, माऊली म्हेत्रे, सागर येवले, दिपक बलाढै, राजीव पाटील, एकता जाधव, हेमंत कुलकर्णी हे पत्रकार उपस्थित होते. या प्रसंगी सुरेश जाधव, अरूण पाटीलव इतर.

अधिक वाचा  प्रसिद्ध कथक कलाकार पंडित बिरजू महाराज यांचे निधन