पुणे- शहरातील वाढती कोरोनाची रुग्णसंख्यनेमुळे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. शहरात कोरोनाची रुग्णसंख्या 100 वरून 1800 वर पोहचली आहे. मात्र रुग्णसंख्या वाढत असली तरी नागरिक आद्यपाही बेफिकिरीने वागताना दिसून येत आहेत. ओमिक्रॉन व कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहारातील कोरोनाचे निर्बंधही कडक करण्यात आले आहेत. रुग्णसंख्येची स्थिती लक्षात घेता, गरज भासल्यास कोणत्याही क्षणी शहरातील जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे.

जम्बो कोविड सेंटरची सद्यस्थिती

कोरोना काळात शहरात 800 बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर काही काळ जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. मात्र ओमिक्रॉनचे रुग्ण सापडल्यानंतर पुन्हा एकदा जम्बो कोविड सेंटरची साफ सफाई व डागडुजी करण्यात आली. सद्यस्थितीला जम्बो कोविड सेंटरमध्ये 200 बेड सुज्ज करण्यात आले आहेत. आयसीयू वार्डही पूर्णपणे तयार करण्यात आले आहेत. या जम्बो कोविड सेंटरमध्ये जनरल वार्ड तयार ठेवण्यात आले आहेत.

अधिक वाचा  नाना पटोलेंवर कठोर कारवाई करा; राज्यपालांना भाजपचे निवेदन