पुणे: वारजे माळवाडी व माई मंगेशकर हॅस्पिटल भुयारी मार्ग या दोन्ही चौकामध्ये गेले अनेक दिवसांपासुन वाहतुकीची फार मोठी कोंडी होत आहे. अर्धा किलोमीटर अंतरासाठी आर्धा-आर्धा तास थांबावे लागत आहे. दोन्ही चौकामध्ये प्रंचड वाहतुक कोंडीमुळे अग्निशामक वाहन व रुग्णवाहीका जाण्याकरीता देखील अडचण होत आहे तरी पुणे महानगरपालिकेच्या वतीने वाहतुक सुरळीत करण्यासाठी किंवा वाहतुक नियोजन गार्ड (वॉर्डन) नेमन्याची मागणी पुणे महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या,धुमाळ दिपाली यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने या भागातील हमरस्ते बंदिस्त केले आहेत परंतु या रस्त्याला घेतच असलेला पुणे महानगरपालिकेचा रस्ता अर्धवट असल्याने नित्याने या भागांमध्ये वाहतूक कोंडी होत आहे. रुग्णवाहीका वेळेवर न पोहचल्यास जिवीतहानी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच परिसारातील ज्येष्ठ नागरिक, महिलांची व लहान मुलांची वाहतुक कोंडीमुळे मोठी कुचबंना होत आहे. नागरिकांना नाहक त्रास करावा लागत आहे. दोन्ही चौकातील वाहतुक कोंडी सोडविण्याकरीता सांय ६ ते ९ या वेळेत वाहतुक पोलीस किंवा वाहतुक नियोजन गार्ड (वॉर्डन) ची अत्यंत आवश्यकता आहे.

अधिक वाचा  ‘आयपीएल’ प्रायोजकत्व : नेमका किती पैशाचा खेळ? 'DFL‘ ते TATA स्थित्यंतराचा हा वेध

तरी या दोन्ही मुख्य चौकामध्ये आपल्या कार्यालया मार्फत सांय ६ ते ९ या वेळेत किमान दोन वाहतुक पोलीस किंवा दोन वाहतुक नियोजन गार्ड (वॉर्डन) नेमण्यात यावे, जेणे करुन दोन्ही मुख्य चौकात वाहतुक कोंडी होणार नाही तसेच नागरिकांची गैरसोय थांबेल तरी व्यक्तिगत लक्ष घालून यांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.