मुंबई : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना  यांचा पुष्पा : द राइज  हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालतोय.

सुकुमार दिग्दर्शित 7 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी केलीय. या चित्रपटाशी संबंधित आणखी एक बातमी म्हणजे हा सिनेमा आता अॅमेझॉन प्राइम वर उपलब्ध होणार आहे.

विक्रमावर विक्रम
सध्या तिसर्‍या आठवड्यात, पुष्पा अजूनही थिएटरमध्ये चांगला चालतोय. 18व्या दिवशी (रविवार) या सिनेमान बॉक्स ऑफिसवर जगभरात 300 कोटींचा गल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा हा चित्रपट केवळ सहावा दक्षिण भारतीय चित्रपट ठरलाय.

अॅमेझॉनवर येणार
बुधवारी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओनं एक ट्विट शेअर केलं, त्यात त्यांनी पुष्पाची तारीख जाहीर केली. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ 7 जानेवारी रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होणार आहे. तेलुगू अॅक्शन थ्रिलर 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता, जो बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. हा चित्रपट हिंदी, मल्याळम, तमिळ आणि कन्नड भाषांसह डब आवृत्त्यांमध्येदेखील प्रदर्शित झाला. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या अधिकृत ट्विटर पेजनं चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा केली.

अधिक वाचा  बाणेर येथून अपहरण झालेला 'डुग्गू' अखेर सापडला