लोकशाहीची चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणा-या पत्रकारांचा आजचा दिवस विशेष आहे . बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने ‘पत्रकार दिन’ हा ६ जानेवारीला घोषित केला आहे.

जगाच्या प्रत्येक कोनातील इत्यंभुत माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार बांधव गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. आपली तहानभूक विसरुन पत्रकार बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता देशातील प्रत्येक घडामोडीबद्दल सविस्तर माहिती तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचवतात. अशा या धाडसी पत्रकारितेला आणि हे काम अगदी निष्ठेने पार पाडणा-यांचा सन्मान करण्याचा आजचा दिवस.

याच दिवसाचे औचित्य साधुन भाजपा सहकार आघाडीचे वतीने चेकमेट टाईम्सचे संपादक धनराज माने , साद-प्रतिसादचे संपादक राजीव पाटील , दैनिक लोकमत सचिन सिंग , बजरंग लोहार , सलीम शेख , दैनिक पुढारीचे प्रदीप बलाढे , दैनिक प्रभातच्या एकता जाधव, विद्या संस्कारचे संपादक हेमंत कुलकर्णी , न्युज मेकरचे संपादक माऊली म्हेत्रे , सार्वभौमचे संपादक दिपक बलाढे यांना भेटवस्तु देऊन या पत्रकार बंधु भगिनींचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे अरूण दांगट , स्वीकृत नगरसेवक संजय भोर, मेजर दत्तात्रय ताकवले आदि मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  राऊत प्रसिद्धीझोतात नशिबानेच; शिवसेना संपत चाललीय त्याची चिंता करा: चंद्रकांत पाटील