मुंबई  – छोट्या पडद्यावरील माझा होशील ना या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचणारा अभिनेता विराजस कुलकर्णी याने अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत साखरपुडा केला आहे.
सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. चाहत्यांकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवानीने विराजसोबत एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या बोटांमधील रिंग दाखवताना दिसत आ

सोबतच तिनं म्हटलं आहे की, Put a ring on it!#2022 #virani…या दोन ओळीच्या कॅप्शन वरून तर त्यांचा साखरपुडा झाल्याचं चाहत्यांच्या लक्षात आलं आहे. चाहत्यांसह सेलेब्सकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अधिक वाचा  छेडछाड मुक्त महाराष्ट्र व्हावा अशी अपेक्षा - खा.सुप्रिया सुळे

मागच्या काही दिवसांपासून अभिनेता विराजस कुलकर्णी शिवानी रांगोळेला डेट करत होता. अनेक ठिकाणी या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

याशिवाय सोशल मीडियावर दोघंही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करायला कधीच कमी पडत नाहीत. अनेकवेळा दोघं एकमेकांसोबतचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. नवीन वर्षात या जोडीनं आता साखरपुडा करून नातं अधिकृतपणे सर्वांच्या पुढे स्वीकारलं आहे. आता ही जोडी लग्नाच्या बंधनात कधी अडकणार याची देखील उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

‘लागिरं झालं जी’ फेम शीतलीचा ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स! पाहा शिवानीने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम केलं आहे. शिवानी ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत शेवटची दिसली होती. तर विराजस माझा होशील ना या मालिकेत शेवटचा दिसला होता.

अधिक वाचा  पुणेकर महिलेची मॅट्रिमोनिअल फेक अकाऊंटवरुन ६२ लाखांची फसवणूक

विराजसला माझा होशील ना या मालिकेतून प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. आदित्य आणि सई प्रेक्षकांच्या फार कमी वेळात पसंतीस उतरले होते. मालिका संपली असली तरी सई आणि आदित्य प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.अभिनेत्री मृणालकुलकर्णी यांचा  विराजस मुलगा आहे. विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने हॉस्टेल डेज या चित्रपटात काम केले आहे.