आपल्या आवडत्या हिरोसाठी एखादा चाहता काय करेल याचा काही भरवसा नाही. चाहत्यांकडून आपल्या आवडत्या स्टारच्या प्रेमापोटी होणाऱ्या अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या बातम्या नेहमीच आपल्या समोर येत असतात.

त्यातच सर्व कलाकारांपेक्षा सलमान खानचे चाहते जरा वेगळेच आहेत. सलमानच्या प्रेमात असलेल्या अशाच एका तरुणीनं थेट घर सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेतील 16 वर्षांची मुलगी तिच्या घरातून पडते आणि फक्त सलमान खानला भेटण्यासाठी मुंबईत आली होती. घर सोडून आलेल्या या तरुणीचं सलमानवर प्रेम होतं आणि या तरुणीला त्याच्याशी लग्न करायचं होतं. सलमान खानसाठी ती काहीही करायला तयार होती. या अभिनेत्रीचं नाव सोमी अली  तिची सलमान खानसोबतची प्रेमकथा सध्या खूप चर्चेत आहे.

अभिनेत्री सोमी अलीने बॉलीवूडचे अनेक प्रोजेक्ट्सही केले, मात्र त्यानंतर सलमान खानसोबत काही सुत जुळलं नाही, त्यामुळे तिने बॉलीवूड सोडलं. भारतातील सगळ्या आठवणी मागे सोडून ती अमेरिकेत परतली आणि आता आपलं जीवन मानवतावादी कार्यासाठी समर्पित केलं. पूर्वीचे दिवस आठवत सोमी अली म्हणते, ‘आम्ही हिंदी चित्रपट पहायचो. मी ‘मैने प्यार किया’ पाहिला आणि सलमानवर क्रश झाला. त्या रात्री मला एक स्वप्न पडलं आणि मी भारतात जाण्याचा निर्णय घेतला. मी 16 वर्षांची असताना मुंबईला जाऊन त्याच्याशी लग्न करू शकेन असा विचार करणं आता मला माझ्यासाठी हास्यास्पद वाटतं. मी लग्नाचं स्वप्न पाहिलं आणि मला वाटलं की हे देवाच्या मनात आहे. मी माझ्या आईला सांगितलं की मी सलमान खानशी लग्न करण्यासाठी मुंबईला जात आहे. ती अमिताभच्या बच्चनच्या काळातली होती, म्हणून तिने मला विचारलं, ‘सलमान कोण आहे?’ मी म्हणाले, ‘तो एक मोठा स्टार आहे आणि मला त्याच्याकडे जायचं आहे. तिने लगेच मला एका खोलीत बंद केलं. मग मी माझ्या वडिलांना सांगितले की, मला मुंबईतील माझ्या मित्रांना भेटायचं आहे आणि ताजमहाल पाहायचा आहे. त्यांचं मन वळवण्यासाठी मी धार्मिक कार्ड खेळलं. मी पाकिस्तानात गेले आणि नंतर मुंबईला आले. मी माझ्या पाकिटात सलमानचा फोटो ठेवला होता. मी इथे पोहोचले तोपर्यंत बागी (1990) रिलीज झाला आणि सलमान आधीच मेगास्टार होता.

अधिक वाचा  मुंबईत भीषण दुर्घटना: ताडदेव परिसरात 20 मजली इमारतीला लागली आग.

सोमी अली पुढे म्हणाली, ‘आम्ही नेपाळला जात होतो. मी त्याच्या शेजारी बसले होते. मी त्याला म्हणाले, ‘मी तुझ्याशी लग्न करायला आले आहे.’ तो म्हणाला, ‘माझी एक मैत्रीण आहे.’ मी म्हणालो काही हरकत नाही. मी किशोरवयात होते. एका वर्षानंतर मी १७ वर्षांची झाले तेव्हा आमचं नातं सुरू झालं. त्याने मला पहिले मी तुझ्यावर प्रेम करतो असं सांगितलं.

सोमी अली पुढे म्हणाली, ‘मी सलमान आणि त्याच्या पालकांकडून खूप काही शिकले. शेवटी, कोणत्याही नातेसंबंधात, आपण आनंदी नसल्यास, वेगळं असणं चांगलं आहे. सलमान आणि माझ्या नात्याबाबतही असंच होतं. मी अमेरिकेला परत जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या पालकांकडून मी जे शिकलो ते न विसता येणारं आहे. एक महत्त्वाचा धडा मी शिकले तो म्हणजे आपण सर्व एकसारखे आहोत. त्यांनी कोणत्याही धर्मात भेदभाव केला नाही. सलमान हा प्राणीप्रेमी होता. जखमी, भटक्या मांजरांना तो उचलून नेत. तो उदार आहे. त्यांचं फाउंडेशन अभूतपूर्व काम करतंय. यासाठी मी त्याचं कौतुक करते

अधिक वाचा  नाना पटोलेंवर कठोर कारवाई करा; राज्यपालांना भाजपचे निवेदन