मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक केदार शिंदे  सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि ते सोशल मीडियावरील पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतात.

दरम्यान आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी त्यांनी कोणत्या ताज्या घटनेवर किंवा मुद्द्यावर आपले मत मांडले नसून खुद्द त्यांनी त्यांची पत्नी बेला शिंदे यांना वाढदिवसाच्या स्पेशल अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

केदार शिंदे यांनी पत्नीसोबतचा फोटो फेसबुकवर शेअर करत स्पेशल अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की, बेला… वाढदिवस शुभेच्छा! माझ्यासारख्या नवऱ्याला इतकी वर्षे सांभाळून घेणं, तसं कठीणच!! पण तू ते लीलया पेललं आहेस. आमच्या क्रिएटिव्ह लोकांचा आलेख म्हणजे, ECG सारखा. चढ उतार तू लीलया पार केले आहेस.

अधिक वाचा  नाना पटोलेंवर कठोर कारवाई करा; राज्यपालांना भाजपचे निवेदन

ते पुढे म्हणाले की, अभिमानाने सांगतो की, तू होतीस म्हणून मी आहे. आधीची वर्षे धडपडीत गेली, नंतरची कर्जाच्या हप्त्यात… मागील दोन वर्ष तर #lockdown मधेच. २०२२ वर्ष आता सुरू झालंय पण त्यालाही O MI CRON (Oh my God) असच म्हणत सुरूवात केली आहे. स्वामी कृपेने मात्र तुझ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्याचं वचन या निमित्ताने देतो. मी आहेच सोबत पण स्वामी पाठीशी उभे आहेत.. तर भय कशाचंच?

केदार शिंदे आणि बेला शिंदे यांच्या लग्नाला झालीत २५ वर्षे पूर्ण
मागील वर्षी केदार शिंदे आणि बेला शिंदे यांच्या लग्नाला ९मे, २०२१ मध्ये २५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने ते दोघे पुन्हा एकदा लग्नबेडीत अडकले होते. त्यांच्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अधिक वाचा  पुणे- शाळा सुरू होणार की नाही आज बैठकीत होणार निर्णय