पुणे शहराच्या मध्यवर्ती मधून मुठा आणि मुळा या दोन नद्या प्रवाहित होत असल्या तरी दिवसेंदिवस या नदीवर अतिक्रमण होत असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. पुणे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठी मोठी आश्वासने आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या नावाने फक्त नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम केले जात असून पुणे शहराचे अस्तित्व ज्या नदीलगत आहे अशा नदीच्या संवर्धनासाठी आपण व्यक्तिगत लक्ष घालण्याची मागणी जयंतरावजी पाटील जलसंपदा व लाभक्षेत्र विकास यांच्याकडे केली आहे.

सत्ताधारी भाजपच्या वतीने अनेक वल्गना केल्या जात असल्या तरी मुळा व मुठा या नद्यांमध्ये आजही महिला राडारोडा सर्रास पणे फेकला जात असल्याने पुणे शहराची जीवनदायिनी सध्या मृतावस्थेत जाण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळेच या नद्यांचे संवर्धन करण्याची गरज लक्षात घेऊन आपण यामध्ये व्यक्तिगत लक्ष घालण्याची विनंती या पत्राद्वारे आपणाकडे करत आहे.

अधिक वाचा  सोयगाव नगरपंचायत: रावसाहेब दानवेंना 'जोर का झटका', शिवसेना 17 पैकी तब्बल 9 विजयी

मी विष्णू सुखदेव सरगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वारजे कर्वेनगर भागांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि पक्षी संवर्धन यामध्ये काम करत असून आज नदीलगत असलेल्या वृक्षांची सर्रास तोड केली जात असल्याने पक्ष्यांना बसण्यासाठी निवारा नाही त्यामुळे विविध सोसायट्यांच्या कॅबल्स आणि खिडक्यांवर ती पक्षांना वास्तव्य करावे लागत आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पक्षांना स्वच्छ पाणी नाही आणि बसण्यास हि निवारा नाही ही दयनीय अवस्था सध्या सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विस्कटलेल्या नियोजनामुळे झाली आहे. खडकवासला पासून पुणे शहराच्या मध्यभागापासून पुणे मनपा या भागामध्ये नदीपात्र आहे. साहेब नागरिकांनी नदीपात्रामध्ये प्लास्टिक, कचरा, निर्माल्य. डबर, अशा अनेक टाकाऊ पदार्थ पासून नदीपात्र विद्रूप करण्यात आलेले आहे.

अधिक वाचा  भाजपने उत्पल पर्रिकरांना पणजीतून उमेदवारी नाकारली

या नदीपात्राचे वारजे माळवाडी कर्वेनगर परिसरात शुद्धीकरण व सुशोभीकरण करण्यात यावे. कर्वेनगर, वारजे माळवाडी, भालेकर वस्ती, शिवणे कोंढवे-धावडे, या भागात सुमारे एक ते दीड लाख लोकांची लोकवस्ती असून गणेश उत्सव आणि दशक्रिया विधी या हिंदू रीतीरिवाज यासाठी नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे; परंतु नदी संवर्धन न केल्यामुळे आज या भागात हे विधी करणे ही अशक्य झाले आहे.

या भागामध्ये परप्रांतीय बांधवांची संख्याही जास्त असून वर्षानुवर्ष या भागात छटपूजेचे चा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. गेल्या दहा वर्षापासून नदीचे पात्र स्वच्छ नसल्यामुळे छटपूजा आणि गणेशोत्सव यासाठी सर्वसामान्य नागरिकांना कायम त्रास सहन करावा लागत आहे. मी विष्णू सरगर विनम्रपणे सर्व नागरिकांच्या वतीने विनंती करतो. आपण हा विषयी लवकरात लवकर मार्गी लावावा ही विनंती.