महा विकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले किंबहूना आणले गेले यास जबाबदार महा विकास आघाडी आणि त्यांचे सहकारी यांना ही गोष्ट मान्य आहे याचं उन्मत्त उदाहरण म्हणजे महाविकास आघाडीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी बाबत केलेले अशोभनीय वक्तव्य आणि या वक्तव्याचा जाहीर निषेध म्हणून भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री योगेश अण्णा टिळेकर ह्यांच्या मार्गदर्शनात आणि भाजपा पुणे शहर अध्यक्ष श्री योगेश बाप्पू पिंगळे ह्यांच्या नेतृत्वात, कोविड चे सर्व नियम पाळून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज सकाळी निषेद आंदोलन केले व जिल्हाधिकारी महोदय यांना जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याबाबत निवेदन दिले.

अधिक वाचा  कलाकृती व चित्ररूपी माध्यमातून कोथरूड - बावधन कार्यालयाचा स्वच्छतेचा व पर्यावरण संरक्षणाचा संदेश....!

ह्याप्रसंगी भाजपा पुणे शहर ओबीसी मोर्च्या चे अध्यक्ष श्री योगेश जी पिंगळे , सुप्रिया ताई भूमकर , यशोधन जी आखाडे, नंदकुमार जी गोसावी , ओंकार जी माळवदकर , शंतनू जी नारके, अमोल जी पांडे , दिनेश जी रासकर, विशाल जी केदारी , विकी जी ढोले , भीम जी देवकाते , संदीप जी कर्डेकर , सिद्धार्थ जी रणधीर, सागर जी धोत्रे आणि मनीष जी साळुंखे उपस्थित होते