पुणे : भारतीय सैन्य दलामध्ये मेडिकल कोअर म्हणून झाँसी ( उत्तर प्रदेश ) या ठिकाणी नितीन महादेव गावडे हे गेली सोळा वर्षापासून सेवा करत आहेत. त्यांची पत्नी गौरी नितीन गावडे यांनी आपल्या आईच्या डायलिसिसच्या औषध उपचारासाठी स्वतःच्या मालकीचे घर विक्री व्यवहारामध्ये आर्थिक फसवणूक आणि मानसिक त्रास झाल्याची तक्रार दिघी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. तरी, त्यांच्या तक्रार अर्जावर त्वरित कारवाई करून संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करावे असे निवेदन भारतीय प्रहार सैनिक संघ पुणे जिल्हा अध्यक्ष कैलास आवारी यांनी दिले आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, मौजे दिघी याठिकाणी सर्वे नंबर 03, हिस्सा नंबर 03 मधील एकूण 140 चौ.मी. पैकी 00 हेक्टर 0.70 आर म्हणजे 70 चौ मी जागा मिळकतवरील आरसीसी बांधकामातील तळमजल्यावरील 30 फूट बाय 20 फूट म्हणजे 600 चौ मी मोजमापातील बांधकाम पिंपरी- चिंचवड मिळकत नंबर 03839 अशी महेंद्र नारायण जगताप यांच्याकडून 2017 मध्ये घेतली होती . आईच्या औषध उपचारासाठी आणि कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिघडल्याने घराची विक्री धर्माजी दशरथ आंबेकर आणि सविता धर्माजी आंबेकर, दाभाडे वस्ती होली बु ता. हवेली जिल्हा पुणे यांना संपूर्ण घर एकूण 36 लाख रुपयात विक्री करण्यात आले. त्यापोटी दोन लाख रुपयाचा युनियन बँक भोसरी येथील चेक नंबर 0 0 84 0 6 हा दिला होता. परंतु,चेक बाउन्स झाला, त्यानंतर पुन्हा चेक बँकेत जमा केल्यानंतर तो पास झाला. संपूर्ण व्यवहाराबाबत दिनांक 19 नोव्हेंबर 2019 रोजी नोटरी ऍड जितेंद्र कांबळे यांचे समक्ष विसार पावती करण्यात आलेली होती, विसार पावतीमध्ये गौरी नितीन गावडे यांच्या नावावर मिळकतीचा सातबारा नोंद झाल्यानंतर खरेदीखत करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे सातबारा 2019 रोजी गौरी नितीन गावडे यांच्या नावावर झाला.परंतु, विश्वास संपादन करून घराचा ताबा घेऊन आणि भाडेकरूशी वाद घालून पूर्व संमतीशिवाय भाडेकरूला घरातून काढून घराचा आणि रूमचा बेकायदेशीर ताबा घेतला आहे. ठरल्याप्रमाणे उर्वरित रक्कम न देता बेकायदेशीर घरचा ताबा घेऊन आणि रूमचे कुलूप तोडून भाडेकरूना काढून फर्निचर केले करत ताबा घेतला आहे.

अधिक वाचा  एसटी कर्मचारी संप बेकायदेशीर - कामगार न्यायालय

त्यामुळे बेकायदेशीर घरचा ताबा घेऊन,शिवीगाळ करत मानसिक आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या धर्माजी दशरथ आंबेकर आणि सविता धर्माजी आंबेकर दाम्पत्यावर कारवाई करण्याची मागणी कैलास आवारी आणि भारतीय प्रहार सैनिक संघ यांनी केली आहे.