डिज्नी प्लस हॉटस्टारने त्यांच्या आगामी हॉटस्टार स्पेशल ह्युमनचा ट्रेलर रिलीज केला असून भारतातील मानवी औषधांच्या चाचण्यांवर आधारीत ही एक वैद्यकीय थ्रिलर सीरिज आहे. ही सस्पेन्स थ्रिलर मालिका मानवी, वैद्यकीय जगाची अनपेक्षित रहस्ये उलगडून दाखवते आणि खून, गूढता, वासना आणि हेरफेर यांचा लोकांवर होणारा परिणाम दाखवणारी चित्तथरारक कथा आहे.

विपुल अमृतलाल शाह आणि मोझेझ सिंग दिग्दर्शित, डिस्ने प्लस हॉटस्टार विशेष मालिका मोजेझ सिंग आणि इशानी बॅनर्जी यांनी लिहिली आहे. या मालिकेत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री शेफाली शाह आणि अष्टपैलू अभिनेत्री कीर्ती कुल्हारी यांच्यासह विशाल जेठवा, राम कपूर, सीमा बिस्वास, आदित्य श्रीवास्तव आणि मोहन आगाशे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलरमधून समोर आलेल्या महत्त्वाच्या पात्रांपैकी एक शेफाली शाहची व्यक्तिरेखा आहे.

अधिक वाचा  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून अभिवादन

शेफाली शाहने मानवी पात्राच्या विविध छटा दाखवणाऱ्या अनेक भूमिका साकारल्या आहेत. ‘ह्यूमन’मधील तिच्या व्यक्तिरेखेविषयी तिच्याच शब्दात सांगायचे झाले तर, ‘ह्यूमन’मधील डॉ. गौरी नाथची भूमिका ही मी आत्तापर्यंत साकारलेल्या सर्व पात्रांपेक्षा गुंतागुंतीची असल्याचे तिने सांगितले. शेफाली म्हणाली, “गौरी नाथ म्हणजे पॅंडोरा बॉक्स आहे. प्रत्येक क्षणाला तुमच्यावर काय आदळते हे कळत नाही. ती क्लिष्ट आणि ठाव न लागणारी व्यक्तिरेखा आहे. मी याआधी अशी भूमिका कधीच केलेली नाही आणि इतकेच नाही, तर मी तिच्यासारख्या कोणाला ओळखत ही नाही किंवा ऐकले देखील नाही!
अभिनेत्री शेफाली शाह आणि कीर्ती कुल्हारी, अभिनित ‘ह्युमन’ १४ जानेवारी २०२२ पासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

अधिक वाचा  एसटी कर्मचारी संप बेकायदेशीर - कामगार न्यायालय