बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर  यांच्याबद्दल एक आनंदाची बातमी आहे.

दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, फरहान आणि शिबानीच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. लग्नाचे ठिकाणही बुक झाले आहे. ‘बॉलिवूड लाईफ’च्या रिपोर्टनुसार, फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरने यावर्षी मार्चमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत एका हॉटेलमध्ये शानदार विवाह सोहळ्यात दोघेही सात फेरे घेणार आहेत.

रिपोर्टनुसार, कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहता फरहान आणि शिबानीने लग्न अत्यंत खाजगी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही केवळ कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीतच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मात्र, लग्नाबाबत फरहान किंवा शिबानीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

अधिक वाचा  भारतीय IT कंपन्यांची जगात छाप ; TCS ने रचला मोठा इतिहास

फरहान आणि शिबानी खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघे अनेकदा एकत्र हँग आउट करताना आणि सुट्टी साजरी करताना दिसतात. गेल्या वर्षीही त्यांनी दिवाळी आणि धनत्रयोदशीची एकत्र पूजा केली होती. रिपोर्ट्सनुसार, फरहान आणि शिबानीचे लग्न कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आले आहे आणि आता त्यांना अजून उशीर करायचा नाही.

फरहान अख्तरने त्याची माजी पत्नी अधुना अख्तरसोबतचे 15 वर्षांचे वैवाहिक जीवन संपवले आहे. तीन वर्षे डेट केल्यानंतर फरहान आणि अधुनाने 2000 मध्ये लग्नगाठ बांधली होती. 2016 मध्ये घटस्फोट झाला. फरहान आणि अधुनाची पहिली भेट ‘दिल चाहता है’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. अधुना हेअरस्टाइलिस्ट होती तर फरहान दिग्दर्शक. याच चित्रपटातून अधुनाने हेअरस्टायलिस्ट म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. लग्नानंतर हे जोडपे दोन मुलींचे पालकही झाले.

अधिक वाचा  भाजपा पुणे जिल्हा युवा मोर्चा तर्फे नाना पटोले यांना जोडेमारो आंदोलन