आगामी निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर शिवसेना  कामाला लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. निवडणुकीची तयारी करा आणि विकास कामांची पोचपावती जनतेपर्यंत पोहोचवा, असे स्पष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुंबईत 500 चौरस फुटांच्या घरांचा कर माफ केल्याचा संदेश घराघरात पोहोचविण्याचे काम करा, असे स्पष्ट आदेश त्यांनी यावेळी दिला.

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील 227 शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक आमदार, खासदार यांची महत्वाची बैठक झाली. शिवसेना पक्षप्रमुख यांची मुंबईतील शिवसेनेच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली.

अधिक वाचा  उत्पल पर्रीकर अपक्ष लढण्यावर संजय राऊत म्हणाले – पणजीतील लढाई आता.....

या बैठकीत मुख्यमंत्री पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागातील झालेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा, असा आदेश दिला नुकताच मुंबईतील पाचशे स्क्वेअर फुटाचा मालमत्ता कराचा निर्णय आपण घेतला तो जनतेपर्यंत पोहोचवा, विकास कामाची पोचपावती जनतेला मिळायला हवी.  मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे. तर माझ्यावर वैयक्तिक टीका होत आहे. या टीकेला मी शांतपणे घेत आहे. कारण मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. ज्याला दाखवायचे त्याला मीत्याच वेळेला करून दाखवतो. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागा आणि मी वेळीच माझ्या कामाने माझी पोचपावती देतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.