मुंबई: “बौद्धजन सहकारी संघ” तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या संस्थेच्या विद्यमाने”शास्ता” दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आणि ऑनलाइन निबंध स्पर्धेचा अंतिम निकाल तसेच बक्षीस वितरण सोहळा असा संयुक्त कार्यक्रम मा. सिद्धार्थ पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अपना बाजार हॉल, नायगाव, दादर, मुंबई – १४ येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरवात कैलासजी मोहिते, सुविधा कदम, संतोष कळंबे यांच्या गोडवाणीने धार्मिक विधी पार पाडून करण्यात आली, सदर विधीनंतर माननीय कार्याध्यक्ष दीपक जी मोहिते यांनी पाहुण्यांचे तसेच आजी माजी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून प्रास्ताविक सादर केले, त्यात संघाच्या ७० वर्ष्याच्या गौरवशाली वाटचाली बाबत सध्या कार्यरत असलेल्या कमेटीने राबवलेल्या अनेक उपक्रमांचा आढावा घेत त्यांच्या कार्याचे कौतुक केले, तसेच सरचिटणीस माननीय संजय तांबे यांनी आपल्या खास शैलीत सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

अधिक वाचा  संसदेच्या नव्या इमारतीला मराठी कलासाज; या कलावंताची निवड

सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून अलिबाग जिल्हा रायगड येथे पोलीस उपनिरीक्षक अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या अनंतजी पवार (वरवेली) यांना सन्मानित करण्यात आले.

त्यासोबतच निबंध स्पर्धेतील अनुक्रमे विजयी स्पर्धक प्रथम क्रमांक विजेत्या वैशाली आनंद पवार, द्वितीय क्रमांक विजेता मिलिंद कृष्णा कदम, तृतीय क्रमांक विजेत्या विधी विरेंद्र गमरे यांना प्रमुख विश्वस्त संजयजी पवार, राजाभाऊ गमरे, के. सी. जाधव, कार्याध्यक्ष दीपकजी मोहिते यांनी गौरवपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले तसेच इतर सहा स्पर्धक सोनाली पवार, संदीप कदम, रोहित गमरे, अमित मोहीते, दीपाली नागे, सुबोध सुर्वे यांना गौरवपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित केले. प्रमुख विश्वस्त संजयजी पवार राजाभाऊ गमरे, के. सी. जाधव, शशिकांत मोहिते, हिशोब तपासणीस संदेश गमरे आदी मान्यवरांनी आपले बहुमूल्य विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अधिक वाचा  कोरोना काळात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगारास अडचणी

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय जाधव, संदीप पवार, संजय मोहिते, सुरेश पवार सर्व विभाग अधिकारी व कार्यकारिणी यांनी भरपूर परिश्रम घेतले शेवटी अध्यक्षीय भाषणानंतर माननीय संजय तांबे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.