उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीस अवघ्या एक ते दिड महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यापूर्वीच सत्ताधारी भाजपसह समाजवादी पार्टी, काँग्रेस यांनी आपल्या प्रचारास प्रारंभ केला आहे. निवडणुकीपूर्वीच जनमताचा कानोसा घेणाऱ्या सर्वेक्षणांनाही आता सुरूवात झाली आहे. टाइम्स नाउ नवभारत या खासगी हिंदी वृत्तवाहिनीने ‘व्हेटो’ संस्थेच्या सहकार्याने केलेल्या सर्वेक्षणामध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उत्तर प्रदेशात भाजपला २३० ते २४९ जागा प्राप्त होतील, असा अंदाज सर्वेक्षणात वर्तविण्यात आला आहे. तसे झाल्यास सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी आरुढ होणारे योगी आदित्यनाथ हे १९८५ नंतरचे पहिले नेते ठरणार आहेत. भाजपला यापूर्वी २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीत ४०३ पैकी तब्बल ३२५ जागा प्राप्त झाल्या होत्या. त्याचवेळी समाजवादी पक्षाला १३७ ते १५२ जागा मिळण्याचा अंदाज सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे २०१७ साली समाजवादी पक्षाला केवळ ४७ जागा प्राप्त झाल्या होत्या. भाजपला २३० ते २४९ दरम्यान जागा मिळतील, असे टाइम्स नाउ नवभारत – ‘व्हेटो’ यांनी केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात समोर आले आहे.

अधिक वाचा  भारतीय IT कंपन्यांची जगात छाप ; TCS ने रचला मोठा इतिहास

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीस अवघ्या एक ते दिड महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यापूर्वीच सत्ताधारी भाजपसह समाजवादी पार्टी, काँग्रेस यांनी आपल्या प्रचारास प्रारंभ केला आहे. निवडणुकीपूर्वीच जनमताचा कानोसा घेणाऱ्या सर्वेक्षणांनाही आता सुरूवात झाली आहे. टाइम्स नाउ नवभारत या खासगी हिंदी वृत्तवाहिनीने ‘व्हेटो’ संस्थेच्या सहकार्याने केलेल्या सर्वेक्षणामध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उत्तर प्रदेशात भाजपला २३० ते २४९ जागा प्राप्त होतील, असा अंदाज सर्वेक्षणात वर्तविण्यात आला आहे. तसे झाल्यास सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी आरुढ होणारे योगी आदित्यनाथ हे १९८५ नंतरचे पहिले नेते ठरणार आहेत. भाजपला यापूर्वी २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीत ४०३ पैकी तब्बल ३२५ जागा प्राप्त झाल्या होत्या. त्याचवेळी समाजवादी पक्षाला १३७ ते १५२ जागा मिळण्याचा अंदाज सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे २०१७ साली समाजवादी पक्षाला केवळ ४७ जागा प्राप्त झाल्या होत्या.

अधिक वाचा  कोथरुडचे किती प्रश्न चंद्रकांत पाटलांनी मांडले? प्रशांत जगताप यांचा प्रश्न

काँग्रेस पुन्हा अपयशी ठरणार, बसपालाही धक्का

यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने प्रचाराची धुरा पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी – वाड्रा यांच्यावर सोपविली आहे. मात्र, त्यांनादेखील आपले बंधु राहुल गांधी यांच्याप्रमाणेच अपयशाचा सामना करावा लागणार असल्याचे दिसत आहे. सर्वेक्षणात काँग्रेसला केवळ ४ ते ७ जागांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, २०१७ सालीदेखील काँग्रेसला केवळ ७ जागांवर यश मिळाले होते. त्यामुळे गांधी कुटुंबाच्या नेतृत्वाखाली यश मिळेल, अशी काँग्रेसची अपेक्षा पुन्हा एकदा फोल ठरण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेससोबतच मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचीदेखील वाताहत होईल, असा चित्र सर्वेक्षणातून निर्माण झाले आहे. पक्षाला केवळ ९ ते १५ दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज असून २०१७ साली त्यांना १९ जागा मिळाल्या होत्या. सध्या प्रबुद्ध संमेलनांद्वारे ब्राह्मण मतदारांना चुचकारून पुन्हा एकदा सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग करू पाहणाऱ्या मायावती यांना पुन्हा अपयश येईल, असे सर्वेक्षणात दिसत आहे.