मराठा सेवा संघ पुणे शहराच्या वतीने 3 जानेवारी ते 12 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती पर्यंत महिलांच्या सन्मानासाठी दशरात्रौ महोत्सव साजरा करण्यात येत आहे या दहा दिवसांमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ शिक्षकांचा सन्मान, राणी येसूबाई यांच्या सन्मानार्थ सन्मान, महाराणी ताराराणी यांच्या सन्मानार्थ सन्मान, हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या सन्मानार्थ सन्मान  पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ सन्मान, फातिमा बेगम शेख यांच्या सन्मानार्थ सन्मान व पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांच्या सन्मानार्थ सन्मान अशा प्रकारे समाजातील सर्व क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  किरीट सोमय्यांची मुंबईच्या महापौरांवर टीका ,“काही दिवसात अशाच आणखी कंपन्या, व्यवहाराचे पुरावे......

छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते आज उपजिल्हाधिकारी सौ गीतांजली संदेश शिरखे यांचा महाराणी ताराराणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शिवश्री राजेंद्र कुंजीर , मराठा सेवा संघाचे पुणे शहराध्यक्ष शिवश्री सचिन आडेकर, शिवश्री हनुमंत मोटे, शिवश्री महेश टेळे पाटील, उत्तम कामठे, राकेश भिलारे, देवदास लोणकर, नाना निवंगुणे, आदी यावेळी उपस्थित होते.