बीडीडी चाळीच्या पुनर्विकासामुळे मुंबईच्या इतिहासातील नव्या टप्प्याला सुरुवात होत आहे, असे उद्‍गार गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी काढले.

बीडीडी चाळ, नायगाव येथे आज (मंगळवार) दुपारी दोन वाजता गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड प्रत्यक्ष भेट देणार आहेत. या चाळीच्या पुनर्विकासाच्या कामाला आज  सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर  ते बोलत होते.

चाळींच्या प्रत्येक दगडाला इतिहास आहे असे सांगून डॉ. आव्हाड पुढे म्हणाले बीडीडी चाळ ही सांस्कृतिक चळवळीची साक्ष देणारी चाळ आहे. शंभर वर्षापूर्वी बांधलेल्या या इमारतींचा पुनर्विकास व्हावा हे गेले पंचवीस वर्षे  पाहिलेले स्वप्न आता पूर्ण होत आहे.  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनात हे काम सुरु होत असल्याची माहिती डॉ.आव्हाड यांनी दिली आहे.

अधिक वाचा  Bluetooth Neckband लाँच 8 मिनिटांच्या चार्जिंगवर 8 तास चालते