पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या वतीने (व्हीएसआय) देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा ‘कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कार’ सांगलीतील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. अडीच लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मंगळवारी (४ जानेवारी) होणाऱ्या व्हीएसआयच्या सर्वसाधारण सभेत या पुरस्कारासह अन्य विविध पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कारासाठी सांगलीतील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, दौंडमधील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड हे कारखाने पात्र होते. मात्र, या कारखान्यांना यापूर्वी हा पुरस्कार मिळाला असल्याने क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याची निवड करण्यात आली. कै. विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार दौंडमधील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याला जाहीर झाला आहे. कै. डॉ. अप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार सांगलीतील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. कै. कर्मयोगी शंकरराव पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार सांगलीतील उदगिरी शुगर अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड कारखान्याला, कै. किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार सांगलीतील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार फलटणमधील शरयू अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडला जाहीर झाला आहे, अशी माहिती व्हीएसआयचे उपाध्यक्ष आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे, महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी दिली.

अधिक वाचा  वॉर्ड पुर्नरचनेचा अहवाल आज आयोगाकडे सादर होण्याची शक्यता

अन्य पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार दक्षिण विभागात कराडमधील सह्याद्री सहकारी साखर कारखाना, मध्य विभागात नाशिकमधील द्वारकाधीश साखर कारखाना आणि उत्तरपूर्व विभागात जालना येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना यांना जाहीर झाले आहेत. उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार कोल्हापुरातील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, नाशिकमधील द्वारकाधीश साखर कारखाना आणि उस्मानाबादमधील नॅचरल शुगर अ‍ॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज या कारखान्यांना जाहीर झाले आहेत.

तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार

दक्षिण विभाग
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कराड
डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना
जयवंत शुगर्स लिमिटेड कराड

अधिक वाचा  ओमिक्रॉनवर येत आहे पुण्यात पहिली स्वदेशी लस

मध्य विभाग
दौंड शुगर प्रायव्हेट लि.,
इंदापूर नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी सहकारी साखर कारखाना नगर

उत्तरपूर्व विभाग
कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना,
बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड औरंगाबाद
यांना जाहीर झाला आहे, असे देशमुख यांनी सांगितले.