मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी सुपरस्टार शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानला  अटक प्रकरणामुळे एनसीबीचे  अधिकारी समीर वानखेडे चांगलेच गोत्यात आले आहे.

आता त्यांचा मुंबईतला कार्यकाळ संपला असून दिल्ली गृहखात्याने सुद्धा वाढवी मुदत देण्यास नकार दिला आहे. याची थोड्यात वेळात दिल्लीत घोषणा होणार आहे. एनसीबीचे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकापाठोपाठ अनेक गंभीर आरोप झाले. त्यामुळे ३१ डिसेंबरला समीर वानखेडे यांचा कार्यकाळ संपला आहे.

पण, वाढीव मुदत मिळावी यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केला. पण दिल्ली गृहखात्याने समीर वानखेडे यांना मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यामुळे समीर वानखेडे पुन्हा त्यांच्या कॅडरमध्ये जाणार आहे. ED ADG म्हणून त्यांची नियुक्ती होवू शकते.

तसंच. NIA चे DG म्हणून देखील समिर वानखेडे यांच्या नावाची चर्चा आहे, याबद्दल दिल्लीत थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे. आज रात्री ७.३० ची मुंबई-दिल्ली विमानाने समीर वानखेडे दिल्लीला जाणार आहेत. तेथे त्यांना अधिकृतपणे मुदतवाढ नाकारल्याचे सांगितले जाईल आणि त्यांची नियुक्ती पुढे कुठे केली जाईल याबाबत देखील सांगितले जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा  'ग्लोबल टीचर' डिसले यांच्या रजेवर अंकुश; योगदान तपासणीचा निर्णय

तीन दिवसांपूर्वीच समीर वानखेडे यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपला आहे. ऑगस्ट 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत त्यांनी 96 जणांना अटक केली आणि 28 गुन्हे दाखल केले. 2021 मध्ये त्यांनी 234 लोकांना अटक केली आणि 117 गुन्हे दाखल केले. एनसीबीने पुढे माहिती दिली की समीर वानखेडेने सुमारे 1000 कोटी रुपयांचे 1791 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले आणि 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता गोठवली.

समीर वानखेडे यांनी NCB मध्ये काम करण्यापूर्वी एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) चे उपायुक्त आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) अतिरिक्त एसपी म्हणून काम केलं. नंतर त्यांची कस्टम्सचे सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि मुंबई विमानतळावर त्यांची नियुक्ती झाली. मुंबई एअर इंटेलिजेंस युनिटमध्ये काम करत असताना त्यांनी अनेक सेलिब्रेटींना पकडले जे कस्टम ड्युटी चुकवत होते. ऑगस्ट 2020 मध्ये, सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ते एनसीबीमध्ये पोहोचले.

अधिक वाचा  अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसे भुमिकेवरुन भाजपकडून प्रतिक्रिया “एक अभिनेता म्हणून"....

प्रकरण स्वत:च्या हातात घेत त्यांनी 33 हून अधिक जणांना अटक केली. 2021 मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना ‘गृह मंत्री पदक’ नं सन्मानित करण्यात आलं होतं. अभिनेत्री रिया चक्रवर्तीपासून सुरुवात करून, अनेक हाय-प्रोफाइल बॉलीवूड सेलिब्रिटींची एनसीबीने वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली चौकशी केली आणि त्यांना अटक केली. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्न कनेक्शन प्रकरणावरून रिया चक्रवर्ती, भारती सिंग,समीर खान, अरमान कोहली यांची चौकशी समीर वानखेडे यांनी केली होती.

त्यांनी आतापर्यंत 324 आरोपींना अटक केली होती. पण, नोव्हेंबर महिन्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक केली होती. या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुराव्यानिशी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे वानखेडे यांची पुरती अडचण झाली होती.

अधिक वाचा  वयाच्या तिसऱ्या वर्षीपासून राष्ट्रपती भवनात सेवा करणारा विराट १९ वर्षांनंतर सेवानिवृत्त

एवढंच नाहीतर मुंबई उच्चन्यायालयाने सुद्धा आर्यन खानकडे कोणतेही अंमली पदार्थ सापडले नाही असं म्हणत समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. या प्रकरणी एनसीबी बॅकफुटवर गेली. दिल्लीतील अधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांच्याकडून मुंबईतील काही प्रकरणं सुद्धा काढून घेतली होती. त्यानंतर आता मुदवाढ सुद्धा देण्यात आली नाही.