पुणे- राज्यात ऑमिक्रॉन रुग्णांसोबतचा कोरोनाच्या रुग्ण संख्येतही वेगाने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळं राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याची चर्चाही सुरु झाली आहे. ओमिक्रॉनचा समूह संसर्ग सुरु झाला आहे का? मागील एक आठवड्याच्या काळापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. जी रुग्ण संख्या दैनंदिन जीवनामध्ये एक हजार पेक्षाही कमी होती. त्याचा रुग्ण संख्येने काल पाच हजार ते आठ हजारांचा आकडा ओलांडला आहे. वेगाने रुग्ण संख्येत होणारी वाढ ही तिसऱ्या लाटेची चाहूल आहे. त्या दिशेने आपण चालले आहोत, अशी माहिती डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे.

यामध्ये महत्वाची गोष्टी अशीही की रुग्ण संख्याजरी वाढत असलीतरी प्रत्येक जिल्ह्यातून रिपोर्ट येत आहेत . या रिपोर्टमध्ये लक्षण विरहीत रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. हे नियमितपणे आपण करता असलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. यातून सद्यस्थितीला सौम्य स्वरूपात ही लाट सुरु आहे . पुढील दोन आठवड्यापर्यंत याचे जे स्वरूप आहे ते आपल्यासमोर स्पष्ट होईल. अशी माहिती डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे.

अधिक वाचा  पंतप्रधान मोदी ठरले जगातील सर्वाधिक Rating असलेले लोकप्रिय नेते

ओमिक्रॉन रुग्ण वाढीची करणे

राज्यातील ओमिक्रॉन रुग्णसंख्येच्या आकड्याने ५०० पर्यंत मजला मारली आहे. त्यातील २०० रुग्ण बरे झाले आहेत. आपण सुरवातीपासून दोन स्तरावर सर्वेक्षण करत आहे . एका विमातळावर प्रदेशातून येणारे नागरिक याचे टेस्टिंग होत आहे. याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतात परत आलेल्या व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे. तसेच मागच्या काही दिवसांपासूननियमितपणे घेण्यात येणाऱ्या सॅम्पलमध्ये ओमिक्रॉन सापडतोय का याची चाचपणी केली जात आहे. तर यातही काही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहे. मात्र यामध्ये अनेक अन्वेषण करण्याची गरज आहे. यासाठी आयसीएमआर त्याबरॊबरच तपासणी करणाऱ्या वैद्यकीय तपासणी लॅब यांचे यावरील भाष्य हे अंतिम भाष्य असणारा आहे.

अधिक वाचा  चंद्रकांतदादा यांच्या हातात उत्पल पर्रिकरांना तिकीट देणं नाही, हे तर बोलघेवडे- राऊत

त्यामुळे ओमिक्रॉच्यासमूह संसर्गाच्या बाबत आपणच आयसीएम काय म्हणते ते पाहणे आवश्यक असणार आहे. यामध्ये सध्या जरी ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असतील तर एक प्रकारेचे लक्षण आहे की ओमिक्रॉन आपल्याकडं आलेला आहे. हे या लक्षणावरून दिसून येते. मात्र या बाबतचे अंतिम भाष्य शिखर संस्था आयसीएमी आरने करणे गरजेचे असल्याचे मत आवटे यांनी व्यक्त केले आहे.

लॉकडाऊनची गरज आहे का?

रुग्णसंख्या वाढली तरी रुग्णालयात रुग्ण भरती होण्याचे प्रमाण कमी आहे. परदेशात ज्या प्रमाणे ओमिक्रॉनचे लाट पसरली , हे बघून आपल्याला नियोजन करावे लागणार आहे. ओमिक्रॉन वेगानं पसरत आहे, पण आजाराची लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे रुग्ण संख्येवाढीचा नागरिकांनी दडपण बाळगण्या पेक्षा जेष्ठ व्यक्ती, लहान मुले, तसेच आजारी लोकांपर्यत हा विषाणू पोहचू नये. त्यामुळे विषाणूंचा वेग कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असेही ते म्हणाले आहेत. याबरोबरच ओमिक्रॉन संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमाना जाण्याचे टाळणे, इतकच नव्हेतर कोरोनाच्या नियमांचे पालन केले तरी आपण ओमिक्रॉनच्या विषाणूला रोखण्यात यशस्वी होऊ अशी माहिती त्यांनी दिली आहे.