पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. “ हे वर्ष सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे आणि उत्तम आरोग्याचे जावो. ” तसेच, “आपण प्रगती आणि समृद्धीची नवीन उंची गाठत राहू आणि आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणखी कठोर परिश्रम करूया,” असे पंतप्रधानांनी आपल्या वर्ष २०२२ च्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पीएम मोदींनी त्यांच्या “मन की बात” कार्यक्रमातील एका भागाची क्लिप देखील ट्विटसोबत शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लोकांना देशाला विकासाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी “मोठा विचार करा, मोठी स्वप्ने पाहा आणि स्वतःला समर्पित करा आणि २०२२ हे वर्ष नवीन भारत घडवण्यामध्ये सोनेरी पान बनवा” असे आवाहन केलेले आहे.

अधिक वाचा  भाजपाकडून नाना पटोले विरोधात पुण्यात पोस्टरबाजी“आपण पुण्यात कधी येताय, ते सांगा…”;

तसेच, “आपली स्वप्ने आपल्यापुरती मर्यादित नसून आपली स्वप्ने समाज आणि राष्ट्राच्या विकासाशी संबंधित असायला हवीत.”, असे मोदींनी रेडिओ संबोधनात म्हटले होते.

याचबरोबर त्यांनी म्हटले की, आपल्याला देशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे, यासाठी आपल्याला आपल्या संसाधनांचा वापर करावा लागेल. हा एक प्रकारे आत्मनिर्भिर भारताचा मंत्र आहे. आपल्या संसाधनांचा योग्यप्रकारे उपयोग करूनच आपण स्थानिकांची ताकद ओळखू शकतो आणि आपल्या देशाला आत्मनिर्भर बनवून शकतो.