नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकार घालवायचे आहे आणि रिपब्लिकन पक्षाला यावर्षी मजबूत करायचं. तसेच सर्व जातीय लोकांना पक्षात आणायचं समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करायचा, असा संकल्प केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभला भेट देऊन अभिवादन केलं. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, त्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विजयस्तंभाला मानवंदना दिली. कोरेगाव भीमा इथला इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीने निधी मंजुर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील समिती त्यासाठी काम करेल. त्याचबरोबर तुळापूर आणि वढू इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला भव्य बनवले जाईल, असं अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा  मोठा निर्णय, पुण्यासाठी 1000 कोटी रुपयांचा निधी मंजूर

आजचा दिवस आमच्यासाठी अभिमानाचा –भीमा कोरेगावला मी भेट दिली आहे. आजचा दिवस हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस असून भीमा कोरेगाव या ठिकाणी 500 महार समाजातील लोकांनी बलिदान दिलं आहे. अशा या लोकांना अभिवादन करण्यासाठी आज आंबेडकरी जनता येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने पूढे जाऊया. आपली भव्य शक्ती आणि भीम शक्ती एकत्र करूया, असे आवाहन यावेळी आठवले यांनी केलं.नव्या वर्षासाठी सादर केली कविता –आज मला झालेला आहे फारच हर्ष. आज मला झालेला आहे फारच हर्ष. करण आज आमच्या समोर उभं आहे 2022 वर्ष. आज मी लोणावळ्यात होतो तिथं मी नष्ट केला 2021 च आणि 2022 मध्ये मी तिथून निघून गेलो. या वर्षांत आपण सर्वजण पूढे जाऊ या आणि काम करूया, असं देखील यावेळी आठवले म्हणाले

अधिक वाचा  शाळा कधी सुरू होणार? राजेश टोपेंनी दिले संकेत