नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा अपघात. 2022 च्या सुरुवातीला आज पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. नववर्षानिमित्त माता वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान आतापर्यंत 11 भाविकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 15 जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या सर्वांवर कटरा आणि ककरायल नारायण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर माता वैष्णोदेवीची यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे.

बचावकार्य सुरूच आहे, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येथे मोठ्या संख्येने भाविक पोहोचले होते. यादरम्यान चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. सर्वात आधी 7 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर हळूहळू हा आकडा सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरूच आहे. अद्याप प्रशासनाकडून कोणतेही निवेदन आलेले नाही.

अधिक वाचा  अमृता फडणवीस यांनी काव्यशैलीत नाना पटोले यांना लगावला टोला

नववर्षानिमित्त भाविक दर्शनासाठी वैष्णोदेवी मंदिरात पोहोचले. दरवर्षी नववर्षाच्या निमित्ताने हजारो भाविक माता वैष्णोदेवीच्या मंदिरात पोहोचतात. मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दरवर्षी विशेष काळजी घेतली जाते, मात्र शनिवारी सकाळी झालेल्या या चेंगराचेंगरीबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. प्रचंड गर्दीमुळे वैष्णोदेवी मंदिर कॅम्पसमध्ये चेंगराचेंगरी झाल्याचे सध्या बोलले जात आहे.