सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या (BJP) सिद्धिविनायक पॅनेलचे आतापर्यंत 10 उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीला 6 जागा मिळाल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांची प्रतिष्ठ पणाला लागली होती. नारायण राणे विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याच निवडणूक झाली. शिवसेनेचे अनेक दिग्गज पराभूत झाले आहेत. मात्र, महाविकास आघाडी आणि भाजपचेही अनेक नेते पराभूत झाले आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतिश सावंत (Satish Savant) हे चिठ्ठीवर पराभूत झाले आहेत.

अधिक वाचा  शिवसेनेने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी

तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा पराभव झाला. सुशांत नाईक विजयी झाले आहेत. सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे बंधू आहेत. वैभव यांनीच विधानसभा निवडणुकीत 2014 मध्ये नारायण राणे यांचा पराभव केला होता. त्यामुळे राणे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या तेली यांचा पराभव हा पुन्हा नाईक यांनी दिलेला धक्का मानला जात आहे. तेली यांच्या नशिबात जिल्हा बॅंक नसल्याचे या निकालातून दिसून येत आहे. या आधी ते दोनदा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. आता त्यांनी पराभवाची हॅटट्रीक केल्याचे आज स्पष्ट झाले.

अधिक वाचा  सहकार आयुक्तांची भाजपा सहकार आघाडी शिष्टमंडळाने घेतली भेट

सतिश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यानंचरच नितेश राणे अडचणीत आले होते. त्यामुळे सावंत यांचा पराभव भाजप आणि राणेंसाठी महत्वाचा होता. सावंत यांचा पराभव करून विठ्ठल देसाई हे विजयी झाले. राणे आणि सावंत या दोघांनाही समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठीवर देसाई हे विजयी झाले.