पिंपरी-चिंचवड शहरात ओमिक्रॉनबाधित व्यक्तीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 52 वर्षीय पुरुषाचे शहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात निधन झाले. हे 52 वर्षीय गृहस्थ नायजेरियातून परतले होते. 28 तारखेला त्यांचा मृत्यू झाल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने पत्रकात सांगितले आहे.

या व्यक्तीला 13 वर्षांपासून मधुमेह होता. या व्यक्तीचा मृत्यू कोव्हिडशिवाय अन्य कारणांमुळे झाला आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या अहवालात आज हे समजले की या व्यक्तीला ओमिक्रॉनची बाधा झाली होती. गुरुवारी (30 ऑक्टोबर) राज्यात 5368 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर दिवसभरात 22 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यात मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. आज राज्यात 198 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे.

अधिक वाचा  बावधनच्या शाळेचे खाजगीकरण थांबवा अन्यथा टाळा ठोको: मनसे

31 डिसेंबरसाठी गृहविभागाची नियमावली जारी

राज्याच्या गृह विभागानेही कोरोना व्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर नियमावरी प्रसिद्ध केली. त्यानुसार खालील सूचना सर्व नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत.

नवीन वर्ष शक्यतो घरीच साजरं करा.

समुद्र किनारा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

संध्याकाळी 9 ते सकाळी 6 सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोक नाहीत.

गेट-ने ऑेफ इंडिया, मरिन डृाइव्ह, गिरगाव आणि जुहू चौपाटीवर गर्दी करू नये.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रम करू नयेत.

फटाक्यांची आतशबाजी करू नये.