स्वच्छ सर्वेक्षण मिशन- २०२२” तसेच “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष” अन्वये प्रभाग क्रमांक १०,११,१२ या तीनही प्रभागांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेच्या विविध पातळ्यांवर धडाकेबाज दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मागील वर्षी संपूर्ण देशामध्ये पुणे शहराचा स्वच्छतेच्या संदर्भात पाचवा क्रमांक आल्यामुळे पुणे शहराची प्रतिमा उंचावली आहे.

यामुळे कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे,कचरा वर्गीकरण न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, राडारोडा टाकणे, मेडिकल वेस्ट रस्त्यावर टाकणे, प्लास्टिकचा वापर करणे, कचरा जाळून पर्यावरण दूषित करणे इत्यादी कारणामुळे एकूण ४८ नागरिकांवर तिन्ही प्रभागातील डहाणूकर कॉलनी, कोथरूड गावठाण परिसर, मयूर कॉलनी, रामबाग कॉलनी, जय भवानी नगर, किष्किंधा नगर, परमहंस नगर, गुजरात कॉलनी, भुसारी कॉलनी, नवीन व जुने बावधन गावठाण इत्यादी परिसरामध्ये भरारी पथकाच्या माध्यमातून सदर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

अधिक वाचा  किरीट सोमय्यांची मुंबईच्या महापौरांवर टीका ,“काही दिवसात अशाच आणखी कंपन्या, व्यवहाराचे पुरावे......

रामबाग कॉलनीतील तनवी हॉस्पिटलचे बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर पडले होते सदर खात्यामध्ये हॉस्पिटलचा पत्ता सापडल्यामुळे ५०००/- रुपये दंडात्मक कारवाई करून शुल्क वसूल करण्यात आले. तसेच भाजी विक्री केंद्र व बावधन बुद्रुक मधील ममता मार्ट या ठिकाणी ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीचे प्लास्टिकचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले म्हणून त्यांना प्रत्येकी ५०००/- शुल्क वसूल करण्यात आले. तसेच विविध कारणामुळे कोथरूड परिसर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून ४२,१४०/- शुल्क वसूल करण्यात आले.

सदर कारवाई महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार, हनुमंत चाकणकर, गणेश चोंधे, नवनाथ मोकाशी, वैभव घटकांबळे, रूपाली शेडगे, शिवाजी गायकवाड, संतोष ताटकर, गणेश साठे, सतीश बनसोडे, प्रमोद चव्हाण यांच्या निरीक्षणाखाली मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, गजानन कांबळे, साईनाथ तेलंगी, अशोक कांबळे, अशोक खुडे ईत्यादीनी कारवाई करण्यास परिश्रम घेतले.

अधिक वाचा  राऊत प्रसिद्धीझोतात नशिबानेच; शिवसेना संपत चाललीय त्याची चिंता करा: चंद्रकांत पाटील

पुणे शहर विशेषतः कोथरूड विभाग अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की,” आपला परिसर अस्वच्छ करू नका, सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकू नका, मिश्रित कचरा देऊ नका, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, नदी नाल्यात कचरा टाकू नका असे आव्हान करण्यात आले. अशाप्रकारे गैर कृत्य करून पुणे शहर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांवर भरारी पथकाच्या माध्यमातून तीव्र दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आव्हान वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांनी केले.