मुंबई : शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना न्यायालयाकडून तातडीने दिलासा मिळू शकलेला नाही. जिल्हा सत्र न्यायालयाने आज त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सुरू आहे. न्यायालयाचा आदेश मिळण्याआधीच पोलिसांनी राणेंच्या अटकेसाठी आधीपासूनच फिल्डींग लावली आहे.

नितेश राणे यांच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. यावर काल (ता.28) न्यायालयात साडेतीन तास सुनावणी झाली. न्यायालयाकडून त्यांना तातडीने कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्याने तो वाढवून देण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली. परंतु, न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेतली आहे. आता ही सुनावणी सुरू आहे.

न्यायालय राणेंच्या जामिनावर कोणता निर्णय यावर ते अटक होणार की नाही हे स्पष्ट होईल. मात्र, पोलीस दलाने आधीपासूनच पूर्ण तयारी केली आहे. कणकवली पोलीस ठाण्यात हालचालींना वेग आला आहे. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पोलीस ठाण्यात सुरू आहे. राणेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यास पोलीस तातडीने अटक करण्याच्या हालचाली करतील, असे चित्र आहे.

अधिक वाचा  अनुराग कश्यपला 15 मिनिटांसाठी भेटायचं असेल तर द्यावे लागतील इतके रुपये; शेअर केली पोस्ट

नितेश राणे यांच्या वतीने अॅड. संग्राम देसाई यांनी बाजू मांडत आहेत. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी आणि गजानन तोडकरी हे बाजू मांडत आहेत. काल विशेष सरकारी वकील घरत म्हणाले होते की, अटकपूर्व जामीन अर्जावर अर्जदाराच्या वकिलाने युक्तिवाद केला आहे. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना आम्ही उत्तर दिले आहे. आमचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकलेला नाही. उद्या ऊर्वरीत युक्तिवाद पूर्ण करण्यात येईल. अंतरीम जामिनाची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या नॉट रिचेबल आहेत. कालपासून त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल येत आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेने ते गायब झाल्याची चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु असून पोलिसांची पथके गोव्यातही त्यांच्या शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.

अधिक वाचा  शरद पवारगटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी; यंदा तिरंगी लढती अनिवार्यच? बारामती, माढा, बीडमधून कोण?

काय आहे प्रकरण?

संतोष परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आणि करंजे गावचे माजी सरपंच आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान 18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर हल्ला झाला. इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार शस्त्राने परब यांच्यावर वार केले. या हल्ल्यात परब जखमी झाले. परब यांनी आपल्यावरील हल्ल्याला नितेश राणे यांचे नाव घेतले. त्यानंतर या हल्ल्याच्या तपासाची मागणी शिवसेनेने लावून धरली. तसेच या प्रकरणाला राजकीय शत्रुत्वाच्या संशयावरून नितेश राणे यांच्यासह आणखी काही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना पकडण्याच यश आले आहे. यातील मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. . सातपुते हा नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असल्याने या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे स्वत: या प्रकरणाचा तपास करत आहेत.