गेल्या दशकापासून पुण्यातील प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. या समस्येवर काही प्रमाणात मात करण्यासाठी एका आर्किटेक्चर फर्मने पुढाकार घेतला आहे. न्यूड्स नावाची ही फर्म एक अद्वितीय शाळा तयार करणार आहे, जिथे सर्वत्र वृक्ष आणि झाडे असतील आणि ही शाळा पूर्णपणे इको-फ्रेंडली असेल. या शाळेला फॉरेस्ट स्कूल असे नाव देणार आहे.

या शाळेच्या इमारतीची रचना Infinity च्या आकाराची आहे. कमीत कमी प्रदूषण करणारं तंत्रज्ञान यासाठी वापरता येईल

या शाळेची डिझाईन इतर शाळांपासून अगदी वेगळी आहे. या शाळेत सर्वत्र झाडे लावली जातील. शाळेच्या छतावर एक सायकल ट्रॅकही असेल. सायकल छतावर चालवत नेण्यासाठी एक वेगळा मार्गसुद्धा तयार केला जाईल.

अधिक वाचा  अरविंद केजरीवालांची उत्पल पर्रिकरांना जाहीर ऑफर

शाळेचा प्रत्येक मजला गोलाकार असेल. या मजल्यांना ग्रीन असे नाव देण्यात येणार आहे. हे सर्व मजले एकमेकांपेक्षा वेगळे असतील आणि प्रत्येक मजला विद्यार्थ्यांना काही नवीन गोष्टी शिकवेल. शाळेच्या इमारतीत एक सर्व्हिस ट्रॅकही असेल जेणेकरुन सर्व झाडांची व्यवस्थित काळजी घेता येईल.

या शाळेच्या तळघरात (basement) टेनिस कोर्टही असेल. याशिवाय खास गोष्ट अशी आहे की काही झाडे आणि वनस्पतींची काळजी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली विध्यार्थ्यांनाही घ्यावी लागेल.