आपण बऱ्याचदा कारने फिरताना कारचा एसी सुरू करतो. असे फार क्वचित लोकं असतील की, जे लोक कारमधील एसी वापरत नसतील. आपल्याला हे ही माहित आहे की, कारमधील एसी हा कारमधील इंधनावरतीच चालतो. म्हणजे तो पेट्रोल किंवा डिझेल वरती चालतो. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की कारमध्ये एसी सुरू करण्यासाठी किती इंधन वापरले जाते?

जेव्हाही तुम्ही एसी चालू ठेवून गाडी चालवता तेव्हा त्याचा कारच्या मायलेजवर परिणाम होतो. पण, अनेकांना असा देखील प्रश्न पडतो की, जर आम्ही गाडी चालवली नाही आणि एसी चालू ठेवला तर त्यानुसार गाडीला इंधन खर्च होतो का? होतो तर मग तो किती खर्च होतो?

अधिक वाचा  भाजपा पुणे जिल्हा युवा मोर्चा तर्फे नाना पटोले यांना जोडेमारो आंदोलन

अशा स्थितीत, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की एसीचा मायलेजवर किती परिणाम होतो आणि पार्क केलेल्या वाहनात एसी चालवल्यास किती पेट्रोल खर्च होतो?

गाडीचा एसी कसा काम करतो?

जर कारच्या एसीबद्दल बोलायचे झाले, तर कारचा एसी चालू असताना तो अल्टरनेटरमधून मिळालेली ऊर्जा वापरतो आणि ही ऊर्जा इंजिनद्वारे प्राप्त होते. इंजिन इंधन टाकीतून इंधन वापरते, परंतु कार सुरू होईपर्यंत एसी चालूही होत नाही, कारण एसी कॉम्प्रेसरला जोडलेला बेल्ट हा कारचे इंजिन सुरू झाल्यावरच फिरतो. मग तो सामान्य एसीसारखे काम करतो.

एसीमुळे कारच्या मायलेजमध्ये नक्कीच 5 ते 7 टक्के फरक पडतो. परंतु काही रिपोर्टचे म्हणणे वेगळे आहे. जेव्हा तुम्ही कारमध्ये एसी चालवता तेव्हा त्याचा कारवर अनेक प्रकारे परिणाम होतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही हायवेवर जास्त वेगाने कार चालवली आणि खिडक्या उघड्या ठेवून चालवल्या तर त्याचा वाहनाच्या वेगावर परिणाम होतो. ज्याचा इंधनावर देखील परिणाम होतो. त्यामुळे हायवेवर एसी लावून गाडी चालवत असाल तर मायलेजवर त्याचा तसा काही फारसा परिणाम होत नाही.