मुंबई: देशात दिवसागणित कोरोनाची चिंता वाढत आहे. मुंबई महाराष्ट्रासह देशात कोरोनाचे रुग्ण वेगानं वाढत आहेत. राज्य कोरोना टास्क फोर्सची आज रात्री पुन्हा बैठक होत आहे. या बैठकीमध्ये कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येवर बैठकीत चर्चा होणार आहे. 15 ते 18 वयोगटासाठीचे लसीकरण आणि फ्रंटलाईन वर्करसाठी बूस्टर डोस यासंदर्भात चर्चा होणार आहे.

जानेवारीत कोरोना संख्येचा आढावा घेवून शाळांच्या बाबतीत विचार केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात कोरोना पुन्हा धुमाकूळ सुरू झाला आहे. गेल्या 20 दिवसांत कोरोनाच्या सक्रीय रुग्णांमध्ये 50% वाढ झालीय. तर गेल्या सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर कॅबिनेटमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली.

अधिक वाचा  बावधनच्या शाळेचे खाजगीकरण थांबवा अन्यथा टाळा ठोको: मनसे

या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

राज्यातील कोरोनाची रुग्ण संख्या

राज्यात दिवसभरात 1426 कोरोना रूग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोनाचे 803 नवे रूग्ण आढळून आले आहेत. राज्यात ओमायक्रॉनचे आज 26 रूग्ण आढळले आहेत.