शेतकऱ्यांची वीजतोडणी तसंच MPSC परीक्षेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानभवन परिसरात जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी आंदोलन केलं आहे. यावेळी सरकार कूल वसुली फुल, जनतेच्या प्रश्नाकडे सरकारची पाठ, महाराष्ट्राची लावली वाट अशा पद्धतीचे पोस्टर्सही घेऊन विरोधक सरकारचा निषेध करताना दिसत आहेत. यावेळी राज्यातल्या पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विरोधक करताना दिसत आहेत.

या आंदोलनादरम्यान भाजपा नेते चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक नेते विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत आहे. वीजबिलाचा प्रश्न, पेपरफुटी प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सरकार हरवले आहे, असं लिहिलेला कुर्ता घातला होता. इंग्रज परवडले, त्यांनी कमी लुटलं पण त्याही पेक्षा जास्त लुटणारं हे सरकार असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या वीजतोडणीच्या संदर्भातही चव्हाण यांनी रोष व्यक्त केला आहे.

अधिक वाचा  वारजेतील मनपा कुस्ती संकुल अर्धवटच; चोरांचा सुळसळाट, कुस्तीप्रेमींही निराश