मुंबई : ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या रुपाचे संकट अजूनही सरलेले नसताना कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात दिवसभरात कोरोनाचे 922 नवे रुग्ण आढळले आहेत. कालच्या म्हणजेच 25 डिसेंबरच्या तुलनेत ही रुग्णसंख्या 165 ने वाढली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असून ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे. आज दिवसभरात 326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत सध्या कोरोनाची काय स्थिती ?

मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 14 डिसेंबर रोजी 225 कोरोना रुग्ण आढळले होते. 26 डिसेंबर रोजी हाच आकडा 922 वर पोहोचला आहे. आज दिवसभरात 922 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली. तसेच दिवसभरात 326 रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईत आतापर्यंत 7 लाख 47 हजार 864 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर 97% आहे. सध्या मुंबईत 4295 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अधिक वाचा  इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनात नियमांचं उल्लंघन,संयोजकांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई महापालिका क्षेत्रात रुग्णवाढीचा दर 0.06% तर रुग्णदुपटीचा दर 1139 दिवसांवर आहे. एकट्या मुंबई पालिका क्षेत्रात 14 डिसेंबर रोजी 225 कोरोना रुग्ण आढळले होते. ही संख्या वाढत जाऊन 19 डिसेंबरपर्यंत 336 वर पोहोचली होती. तर 23 डिसेंबर रोजी मुंबईत सक्रिय कोरोनाग्रस्तांचा आकडा 600 पर्यंत पोहोचला होता. आज म्हणजेच 26 डिसेंबर रोजी कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजारपर्यंत पोहोचली आहे.

डिसेंबर महिन्यातील कोरोना रुग्णांची स्थिती

14 डिसेंबर- 225 रुग्ण 15 डिसेंबर- 238 रुग्ण

16 डिसेंबर- 279 रुग्ण 17 डिसेंबर- 295 रुग्ण

18 डिसेंबर- 283 रुग्ण  19 डिसेंबर- 336 रुग्ण

अधिक वाचा  'बॉस माझी लाडाची', नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

20 डिसेंबर- 204 रुग्ण   21 डिसेंबर- 327 रुग्ण

22. डिसेंबर- 490 रुग्ण  23. डिसेंबर- 602 रुग्ण

24. डिसेंबर- 683 रुग्ण 25. डिसेंबर- 757 रुग्ण

26. डिसेंबर-922 रुग्ण

कोरोनाला थोपवण्यासाठी राज्यात प्रतिबंधक नियम

दरम्यान, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबई तसेच पूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. संपूर्ण राज्यभर सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी आहे.

लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसावी आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसावी किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल तेवढी उपस्थिती असावी असे सांगण्यात आले आहे. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसावी आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल तेवढ्याच लोकांची उपस्थिती असावी याची घबरदारी घेण्याचे राज्य सरकारने निर्देश दिलेले आहेत.

अधिक वाचा  ....मग शिवसेनेला बाळासाहेबांनी सडत ठेवले का? फडणवीस

बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी लोकांची उपस्थिती क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी असे नव्या नियमांत सांगण्यात आले आहे.