सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या वादात शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणात आमदार नितेश राणे हे आज पोलिसांसमोर हजर झाले. या हल्ल्याच्या चौकशासाठी उपस्थित राहण्यासाठी कणकवली पोलिसांनी त्यांना 21 तारखेला नोटीस बजावली होती.

नितेश राणे फडणविसांच्या मागे बसले आणि परबांचे पित्त खवळले..

अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्ष, उपअधीक्षक, पोलिस निरीक्षत अशा तिघांनी पाऊण तास ही चौकशी केली. या चौकशीला आपण सर्वतोपरी सहकार्य केल्याचे राणे यांनी नंतर सांगितले. यापुढेही चौकशीसाठी बोलविल्यानंतर हजर राहणार असल्याचे आश्वासन पोलिसांना दिले आहे. जी माहिती पोलिसांना हवी होती ती दिली असल्याचे ही सांगितले.

अधिक वाचा  भाजपकडून पटोलेंवर गुन्हा दाखल; 'ते' वक्तव्य भोवणार?अटकेची मागणी

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख म्हणू संतोष परब काम पाहत होते. त्यांच्यावर 18 डिसेंबर रोजी हल्ला झाला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नीतेश राणे यांच्यावर या प्रकरणी आरोप केले होते. हहल्ला प्रकरणामागे एकूण सात संशयित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील पाचजणांना अटक केली आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. कणकवली रेल्वे स्थानकालगत नरडवे रस्त्यावर शनिवारी (ता. १८ डिसेंबर) सकाळी अकराच्या सुमारास संतोष परब यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याने ते खाली पडल्यानंतर त्यांच्यावर एका तरुणाने चाकू हल्ला केला. त्यानंतर संशयित मोटारचालकाला फोंडाघाट चेकपोस्टवर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

अधिक वाचा  गडकोट किल्ल्यांची नावे मंत्र्यांच्या बंगल्याला गैर नाही; मात्र संभाजी छत्रपती यांची निर्णयकी भूमिका

आमदार नितेश राणे, हाजिर हो! पोलिसांनी नोटीस धाडल्यानं राजकारण तापलं

कणकवली पोलिस ठाण्यात फिर्यादी संतोष परब यांचा पुन्हा एकदा जबाब घेतला आहे. या तपासात पोलिसांनी गुप्तता पाळली आहे. कणकवलीत पोलिस सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या घटनेतील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी सापळा रचला आहे; मात्र मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती सापडलेला नाही.