२०२१ हे वर्ष आता संपत आहे मात्र या वर्षात ज्याप्रमाणे काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील, त्याच प्रमाणे किंबहुना त्यापेक्षाही जास्तच अनेक वाईट, दु:खद अशा घटना, घडामोडी घडल्याचे आपण पाहिले. एकीकडे करोनाचे संकट ओसरलेले नसताना या नव्या संकटांच्या मालिकेने जगभरापासून ते अगदी गावखेड्यापर्यंत सर्वांनाच धडकी भरवली. जगाला चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा, अवर्षण, अतिवृष्टी, ढगफुटी, भूस्खलन अशा अनेक आपत्तींना सामोरं जावं लागलेलं आहे.

जगभऱातील घडामोडींचा आढावा –
एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून संकटांची ही मालिका सुरू झाली आहे. या वर्षाचया फेब्रुवारी महिन्या उत्तराखंड राज्यातील चमोली भागात हिमस्खलन होऊन आलेल्या महापुरात १३ मेगॅवॅट क्षमतेचा धौलीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. २९ जूनला उत्तर ध्रुवाजवळील कॅनडाला उष्णतेच्या लाटेनं हैराण केलं. शीत कटिबंधातील कॅनडामध्ये तापमान थेट ४९.६० सेल्सियस इतकं झालं. पाकिस्तानच्या जाकोदाबादमध्ये ते ५२० पोहोचलं. पाच दिवसातच अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात पृथ्वीतलावरील सर्वोच्च तापमानाचा विक्रम करत ५४.६० सेल्सियसवर पारा गेला. भयानक उष्णतेमुळे कॅनडा व अमेरिकेच्या जंगलांत हजारो ठिकाणी अग्नितांडव सुरू झालं त्यात शेकडो जणांचे बळी गेले. याच काळात स्पेन, फ्रान्स, जर्मनी अशा ४० युरोपीय देशांत तसेच आशिया खंडातील इंडोनेशिया व चीनमध्ये अतिशय अल्पावधीतील अनर्थकारी वृष्टीने दाणादाण उडविली. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यात भलीमोठी घरे व अवजड वाहनांचासुद्धा चुराडा झाला. त्याचवेळी इराक, इराण, सुदान व येमेन हे देश तीव्र पाणीटंचाईतून जाताना दिसले. मध्य-पूर्व व उत्तर आफ्रिका खंडात पाण्यामुळे जनता त्रस्त झाली . ब्राझील व मादागास्कर हे भीषण दुष्काळातून जाताना दिसून आले . अवर्षणाने अल्जेरियातील पाणीपुरवठा ठप्प झाल्यावर तिथल्या जनतेने पाणी बंद तर सर्व व्यवहार बंद पाडले.

अधिक वाचा  पंजाब सरकारला झटका! स्वतंत्र समितीमार्फत होणार पंतप्रधानांच्या सुरक्षेची चौकशी

महापूर, अतिवृष्टी –
याच काळात भारतात बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तासाभरात कुठे १२५ मिली मीटर, तर कुठे २४ तासांत ८९० मिली मीटर विक्रमी पावसाने जबरदस्त पूर आणले. महाराष्ट्रामध्ये तीन दिवसांत १०५ ठिकाणी ढगफुटी झाली. महापूर व दरडी कोसळून ८७२ गावांची हानी झाली व १६५ बळी गेले. कित्येक गावं व शहरं पाण्याखाली जाऊन लाखो लोकांची दैना उडाली. यामध्ये रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई येथे मोठी दुर्घटना घडली होती. तर, करोना संकटकाळात ‘म्युकरमायकोसिस’ अर्थात ब्लॅक फंगसचं दहशत पसरली होती.

अधिक वाचा  कोरोनाच्या संकटामुळे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द

वादळांचा तडाखा –
तौक्ते चक्रीवादळ केरळ किनारपट्टी व लक्षद्वीप मध्ये मुसळधार पाऊस व पूर झाला. तौते वादळामुळे गुजरातचा किनारपट्टीचा भाग तसंच पश्चिम किनारपट्टीच्या भागाची प्रचंड प्रमाणात हानी झाली. तर,

कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र खासकरून सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरात अनेक गावे पुराखाली गेली. सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागामध्ये महापूर तर पश्चिमेकडे म्हणजे कोकणात महापूर आणि सोबत मोठय़ा प्रमाणावर दरडी कोसळण्याच्या घटना असे विदारक चित्र पाहायला मिळाले.

यानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘यास’ चक्रीवादळाने ओडिशासह पश्चिम बंगालमधील काही भागाला या चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला. ओडिशात ५.८ लाख लोकांना, तर पश्चिम बंगालमध्ये १५ लाख लोकांना हलवले गेले.

भीषण आग, दुर्घटना, अपघात –
दरम्यान, भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षाला शनिवारी पहाटे भीषण आग लागली होती. यामध्ये दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. ‘शॉर्ट सर्किट’मुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले होते.

अधिक वाचा  गल्लीतली निवडणूक म्हणजे वर्ल्ड कप जिंकला असे नाही; नवाब मलिक यांचा राणेंना टोला

चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला होता. तर, जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे एक बस दरीत कोसळल्याने ११ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले होते.

याशिवाय, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यतील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस कंपनीला लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.

तर, या वर्षांच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये देशाला हादरवाणारी एक मोठी दुर्घटा घडली. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल (सीडीएस) बिपिन रावत यांचे तामिळनाडूमध्ये कुन्नूर येथे लष्कराच्या हॅलिकॉप्टरला झालेल्या अपघातामध्ये निधन झाले. या दुर्घटनेत बिपिन रावत यांच्या पत्नीस लष्करी अधिकाऱ्यांचा देखील मृत्यू झाला.

अशाप्रकारे वर्षभरात अनेक दुर्घटनांमुळे सर्वसामान्यांचा जीव कायम टांगणीलाच राहिल्याचे दिसून आले. आता नवीन वर्ष २०२२ येत आहे. या वर्षात तरी ही संकटांची मालिका खंडीत व्हावी हीच अपेक्षा आपण बाळगूया.