मध्य प्रदेशातील निमार भागातील खांडवा शहरामध्ये सध्या खासगी शाळेच्या परीक्षेत सामान्य ज्ञानाच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न चर्चेत आहे. शाळेने चित्रपट अभिनेता सैफ अली-अभिनेत्री करीना कपूर यांच्या मुलाचे नाव विचारले आहे. प्रश्न पाहून विद्यार्थ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. यानंतर पालक संघटनेने शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी हा प्रश्न शालेय विद्यार्थ्यांना का विचारण्यात आला आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

खांडवा येथील अ‍ॅकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूलच्या प्रश्नपत्रिकेत करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचे नाव काय असा प्रश्न होता. याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे प्रकरण माध्यमांसमोर आल्यानंतर शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यासोबतच शालेय शिक्षण विभागाने कारवाई केल्याचे बोलले आहे. बोर्डाच्या परीक्षेत, अभ्यासक्रमाबाहेरूनही प्रश्न विचारले जातात, पण ते प्रश्न एकतर माहितीपूर्ण असतात किंवा आवश्यक सामान्य ज्ञानाचे असतात.

अधिक वाचा  मी वेडी नाही..ड्रेसिंगवरुन ट्रोल करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर

अॅकॅडेमिक हाईट्स पब्लिक स्कूलने इयत्ता सहावीच्या मुलांना परीक्षेत हा प्रश्न विचारला होता, त्यावरून गदारोळ झाला. शाळेने सामान्य ज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेत सैफ करिनाच्या मुलाचे नाव विचारले आहे. शाळेच्या या प्रश्नावर पालक शिक्षक संघाने तीव्र प्रतिक्रिया दिली असून, शाळेला प्रश्न विचारायचाच असता तर महापुरुष किंवा बलिदानाबद्दल विचारले असते, असे मत लोकांनी मांडले आहे.

शाळेला पाठवली नोटीस

जिल्हा शिक्षणाधिकारी संजीवकुमार भालेराव यांनी शालेय परीक्षेत विचारलेल्या सामान्य ज्ञानाच्या प्रश्नावर केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी तैमूरचे नाव विचारल्यावर शाळा व्यवस्थापनाला नोटीस बजावली जात असल्याचे म्हटले आहे. शाळेचे उत्तर वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले जाईल ज्यामध्ये शाळेवर योग्य ती कारवाई करण्याबाबत लिहिले जाईल. अशा शाळांमध्ये राष्ट्रहिताच्या गोष्टी सांगायला हव्यात, असेही भालेराव यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

अधिक वाचा  तीर्थक्षेत्र विकास कामे कालबद्धतेत पूर्ण होण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा समन्वय हवा- उपसभापती डॉ गोऱ्हे

दरम्यान, इयत्ता सहावीच्या सामान्य ज्ञानाच्या पेपरमध्ये भारतातील बुद्धिबळातील ग्रँडमास्टर कोण, असे विचारण्यात आले. त्याचवेळी, दुसरा प्रश्न करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या मुलाचे पूर्ण नाव लिहिण्याचा होता. या प्रश्नांमध्ये आणखी तीन प्रश्न विचारण्यात आले असले तरी, ज्या भारतीय हवाई दलाचे पायलटचे लढाऊ विमान पाकिस्तानमध्ये कोसळले त्याचे नाव सांगा? २०१९ मध्ये कोणत्या संघाने आयपीएल कप जिंकला? उत्तर कोरियाचा हुकूमशहा कोण आहे? असे प्रश्न विचारण्यात आल्या आहेत.