एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी संपाचे हत्यार बाहेर काढले. मात्र, संपाचे हत्यार म्यान करा, असा संदेश राज्य सरकारने दिला आहे. राज्य सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण करण्याची मागणी कायम असून त्यासाठी काही कर्मचारी संपावर  ठाम आहेत. असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीचं विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, असा इशाराच कर्मचाऱ्यांना दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर आता योग्य तो संदेश गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. आधीच न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. तर कामावर रुजू न झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना घरीच पाठविण्यात आले आहे. एसटी महामंडळाकडून आवाहन करुनही कामावर न आलेल्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

अधिक वाचा  तीर्थक्षेत्र विकास कामे कालबद्धतेत पूर्ण होण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा समन्वय हवा- उपसभापती डॉ गोऱ्हे

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवार यांनी खडसावले आहे. ते म्हणाले, एसटीचे विलिनीकरण डोक्यातून काढून टाका. पगारवाढीमुळे भाडेवाढ होणार असल्याची माहिती त्यांनी हिवाळी अधिवेशाच्यावेळी विधानसभेत दिली. दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे एस टी कामगार संतप्त झाले आहेत