भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. ही कसोटी मालिका भारतासाठी विशेष असणार आहे कारण दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर भारत अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे टीम इंडियाला ही कसोटी मालिका जिंकणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान दुसरीकडे सेंच्युरियन कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला प्लेइंग इलेव्हन निवडणंही तितकंच कठीण असणार आहे. यामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे तो अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर या दोन फलंदाजांच्या फलंदाजांच्या निवडीचा. त्यामुळे पहिल्या टेस्टमध्ये कोणाची वर्णी लागणार यावर सर्वांचं लक्ष आहे.

चार गोलंदाजांसोबत खेळणार टीम?

टीम इंडिया 4 की 5 गोलंदाजांसोबत मैदानात उतरणार हे पाहायचं आहे. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल कसोटी मालिकेसाठी उपलब्ध नाहीत, त्यामुळे पाच गोलंदाजांबाबत साशंकता आहे.

अधिक वाचा  नागार्जुनने चैतन्य समांथाच्या घटस्फोटावर सोडले मौन