आयकर विभागाने सध्या छापांचा धडाका लावला आहे. गैरव्यवहार करणाऱ्यांच्या घरी ईडी छापा मारत आहे. अशावेळी आयकर विभागाच्या एका पथकाने एका व्यापाराच्या घरावर छापा टाकला. महत्वाचे म्हणजे व्यापाराच्या घरी आयकर अधिकाऱ्यांना चक्क पैशांचे घबाड सापडले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या नोटा मोजण्यासाठी चक्क मशीन मागवण्यात आली. संबंधित ठिकाण्यांवर सुरु असलेल्या छापेमारीत जवळपास 150 कोटी रुपये किमतीच्या नोटा सापडल्याचं बोललं जातं. आणि अजून नोटा मोजल्या जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

आयकर विभागाने कन्नौजमधील एका घरावर छापा मारला. या छापेमारीत पैसे जप्त केले असून हे घर परफ्यूम व्यावसायिक पीयूष जैन यांचे आहे. ज्याने नुकतेच समाजवादी परफ्युम लाँच केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार नोट मोजणी मशीन कानपूरमध्ये आणण्यात आल्या असून रात्री उशिरापर्यंत पथके तपास करत आहेत.

अधिक वाचा  तीर्थक्षेत्र विकास कामे कालबद्धतेत पूर्ण होण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा समन्वय हवा- उपसभापती डॉ गोऱ्हे