राज्याभर नावलौकिक असलेली कुसेगाव (ता.दौंड) येथील श्री भानोबा देवाच्या यात्रेत निघालेल्या देव-दानव युद्ध खेळावर पाटस येथील सामाजिक कार्यकर्ते तानाजी शिवाजी केकाण यांच्याकडून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली तेव्हा राज्यातून आलेल्या भाविकांकडून टाळ्यांचा कडकडाटात करीत भानोबाचे चांगभले करीत त्यांचे कौतुक करण्यात आले आहे..

भानोबा देवाचा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवार दि २१ रोजी दुपारी १२ वाजता देव मंदिरातून दानव बरोबर युद्ध खेळण्यासाठी बाहेर पडताच हेलिकॉप्टरने भानोबा देवाच्या निघालेल्या पालखी व देव-दानव युद्ध खेळावर फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली. तेव्हा लाखोंच्या संख्येत असणाऱ्या भाविकांना हे दृश्य पाहत टाळ्यांचा कडकडाट करून भानोबाचे चांगभले असे उदगार काढत पुन्हा टाळ्यांचा कडकडाट करून भानोबाचे चांगभले असे उदगार काढणारे दृश्य पाहून गावकरी व भक्तांचे चेहरे आनंदाने फुलुन आल्याने हा परिसर भारावून गेला होता..

अधिक वाचा  बाणेर येथून अपहरण झालेला 'डुग्गू' अखेर सापडला

कुसेगावत हेलिकॉप्टरचा आवाज येताच घरातील मंडळी बाहेर येत व चौकातील आलेल्या भाविक भक्तांनी आकाशाकडे पाहत देवावर फुले पडताना चे दृश्य पाहून आनंद व्यक्त केला..

चौकट—

येणाऱ्या काळात भानोबा देवांच्या भक्तांची सोय चांगल्या पद्धतीने कश्या स्वरूपात करण्यात येईल यासाठी प्रयत्न केला जाईल…