मुंबई : देशात कोरोना प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्याचं चित्र निर्माण होत असतानाच ओमिक्रॉनमुळे पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यात ओमिक्रॉनचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी केंद्र सरकारकडून राज्यांना महत्वाचा सल्ला देण्यात आल्याची माहिती मिळतेय. केंद्राकडून राज्यांना येऊ घातलेल्या सण-समारंभांवर निर्बंध लावण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर लसीकरणावर अधिक भर देण्याबाबतही केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.

देशात ओमिक्रॉनचे 300 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. यावेळी राज्य सरकारांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे. राज्यांना पॉझिटिव्ह केसेस, जिल्ह्यांमधील दुप्पट दर आणि क्लस्टरवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच डोअर टू डोअर लसीकरणावर भर देण्याचा सल्लाही केंद्रानं राज्याला दिला.

अधिक वाचा  महापालिकेच्या शाळा इमारत खासगी संस्थांना देण्याचा डाव फसला; राजकीय मंडळींना चपराक

राज्यांना केंद्राचा कोणता सल्ला?

विशेषत: येत्या सणांच्या पार्श्वभूमीवर रात्री कर्फ्यू लावा, मेळाव्यावर बंदी घाला. कोरोनाचे प्रमाण वाढत असताना कंटेनमेंट आणि बफर झोन निश्चित करा.

चाचणी आणि पाळत ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ICMR आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, चाचण्या केल्या पाहिजेत. घरोघरी केस शोधण्याची आणि आरटीपीसीआर चाचणीची संख्या वाढवायला हवी. चाचणी आणि सर्वेलांस कडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ICMR आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, चाचण्या केल्या पाहिजेत. डोर टू डोर केस सर्च आणि आरटीपीसीआर चाचणीची संख्या वाढवायला हवी.

रुग्णालयांमध्ये खाटा, रुग्णवाहिका आणि आरोग्य उपकरणे वाढवण्यावर भर दिला पाहिजे. ऑक्सिजनचा बफर स्टॉक बनवला पाहिजे. 30 दिवसांसाठी औषधांचा साठा करा. अफवा पसरू नयेत म्हणून सतत माहिती दिली जावी, राज्यांनी दररोज पत्रकार परिषद आयोजित केली पाहिजे.

अधिक वाचा  गांधी हत्येचे समर्थन कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही करु शकत नाही', आव्हाडांचा रोखठोक टोला

राज्यांनी 100% लसीकरणावर भर दिला पाहिजे. दोन्ही डोस सर्व वयस्करांना दिले जातील याची खात्री करण्यासाठी घरोघरी मोहीम राबवावी.

राज्यात आज 23 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद

राज्यात आज ओमिक्रॉन रुग्णांची उच्चांकी नोंद झाली आहे. आज दिवसभरात ओमिक्रॉनची लागण झालेले 23 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. या 23 रुग्णांपैकी 13 रुग्ण एकट्या पुण्यातील आहेत. मुंबईत 5, उस्मानाबादेत 2 आणि ठाणे, मीरा-भाईंदर आणि नागपुरात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. आज आढलून आलेल्या 23 नव्या रुग्णांमुळे राज्यातील ओमिक्रॉनची एकूण रुग्णसंख्या 88 वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव आता वेगानं होत असल्याचं पाहायला मिळत आहे.