विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. अनेक पक्षांनी राजकीय फोडाफोडीला सुरवात केली आहे. यात आघाडीवर असलेल्या भाजपलाच आता मोठा धक्का बसला आहे. भाजपचे आमदार कार्लोस अल्मेडा यांनी पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसचा हात हातात घेतला आहे.

गोव्यात विधानसभा निवडणुकीमुळे फोडाफोडीला जोर आला आहे. यात भाजपसह तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने आघाडी घेतली होती. आता काँग्रेसही मैदानात उतरली असून, भाजपला पहिला धक्का दिला आहे. भाजपचे आमदार कार्लोस अल्मेडा यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अधिक वाचा  भाजपकडून पटोलेंवर गुन्हा दाखल; 'ते' वक्तव्य भोवणार?अटकेची मागणी

अल्मेडा हे दोन वेळा वास्को द गामा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. पक्षाकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पुढे केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपमध्ये राहून सार्वजनिक जीवनात जनतेसाठी काम करणे अशक्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपचे आणखी आमदार पक्ष सोडण्याच्या वाटेवर असून, ते लवकरच राजीनामा देतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

आता केवळ मजा बघा! माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला इशारा
दरम्याना, भाजप नेत्या अलिना सलडान्हा यांनी नुकताच आमदारकीचा राजीनामा दिला होता. अलिना यांनी त्यांच्या पती मथानी सलडान्हा यांच्या निधनानंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. अखेर अलीना यांनी आम आदमी पक्षाला पसंती दिली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत त्यांनी आमदारकीच्या राजीनाम्यानंतर काही तासांतच आपमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून बाहेर पडलेल्या त्या पहिल्या आमदार ठरल्या आहेत. तसेच त्यांच्या प्रवेशाने आपची ताकदही वाढली आहे.

अधिक वाचा  ‘पुष्पा’ सिनेमातल्या शेषाचलम जंगलाबद्दल थक्क करणाऱ्या गोष्टी…

राजीनामा देताना सलडान्हा म्हणाल्या होत्या की, भाजपमध्ये मथानी सलडान्हा हे आले होते. त्यांच्या निधनानंतर त्या जागेवर मी राजकारणात प्रवेश केला होता. पण आता भाजप हा पक्ष पूर्वीसारखा राहिलेला नाही. आपल्या सर्व तत्वांना पक्ष विसरला असल्यासारखे वाटते, असे सलडान्हा म्हणाल्या. सलडान्हा यांनी अद्याप भाजपला सोडचिठ्ठी दिली नसली तरी त्या याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे