नवी दिल्ली : नवं वर्ष उजाडण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सरत्या वर्षात खाद्यजगतात घडलेल्या घडामोडींचा मागोवा घेण्यात आला आहे. भारतातील आघाडीची ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी ‘स्विगी’नं भारतीयांचं रिपोर्ट कार्ड जारी केलं आहे. ग्राहकांच्या वर्षभरातील डिलिव्हरींचे विश्लेषण करुन कंपनीने अहवाल तयार केला आहे. सर्वाधिक पसंतीच्या स्नॅक्सच्या यादीत समोसा टॉप ठरला आहे.

गेल्या सहा वर्षांपासून ‘स्विगी’द्वारे डिलिव्हरी ऑर्डरचे संख्याशास्त्रीय विश्लेषण केले जाते. ‘स्विगी’ने यावर्षीच्या डिलिव्हरी ऑर्डरचा विश्लेषणात्मक अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. स्विगी फूड डिलिव्हरी, इन्स्टामार्टवर किराणा, स्विगी जेनी आणि हेल्थहब वर पिक-अप आणि ड्रॉप सेवा यासारख्या सर्व सेवांसाठी प्राप्त ऑर्डरनुसार अहवाल बनविण्यात आला आहे.

अधिक वाचा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त अभिवादन

स्विगी’ अहवालाची टॉप वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

वर्ष 2021 मध्ये सर्वाधिक ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थात बिर्याणीनं नंबर एकवर कायम आहे.

‘स्विगी’ला भारतभरातून वर्षभरात प्रति मिनिट 115 बिर्याणी ऑर्डर प्राप्त झाल्या.

मिठाई किंवा गोड पदार्थाच्या ऑर्डर डिलिव्हरीत गुलाबजामने बाजी मारली आहे.

भारतीयांनी गुलाबजामनंतर रसमलाईची सर्वाधिक वेळा ऑर्डर नोंदविली.

स्विगीवर पावभाजीच्या वर्षभरात 21 लाख ऑर्डर नोंदवल्या गेल्या.

स्विगीच्या अहवालात ग्राहकांच्या ऑर्डरच्या वेळेचा देखील विचार करण्यात आला आहे.

रात्री दहा वाजेनंतर सर्वाधिक ऑर्डर गार्लिक ब्रेडची नोंदविण्यात आली आहे. त्यासोबतच पॉपकॉर्न, फ्रेंच फ्राईज यांनाही ग्राहकांनी पसंती दिली आहे.

अधिक वाचा  विद्यापीठात नवा विक्रम ५ हजार झाडांना ‘क्यूआर कोड’

ग्राहकांनी ‘स्विगी’वर संध्याकाळी सात ते नऊ वाजेदरम्यान सर्वाधिक ऑर्डर दिल्या. स्विगीने सात ते नऊ ही कंपनीसाठी सर्वाधिक व्यस्त वेळ असल्याचे म्हटले आहे.

स्विगीच्या अहवालानुसार, बंगळुरु आरोग्याबाबत सजग असलेले पहिल्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. बंगळुरुनंतर हैदराबाद आणि मुंबईची वर्णी लागली आहे.

सर्वाधिक डोसा ऑर्डर करण्याच्या यादीत बंगळुरु क्रमांक एकचं शहर ठरलं आहे.

स्विगीच्या अहवालात चैन्नई सर्वात उदार शहर ठरलं आहे. स्विगी डिलिव्हरी पार्टनरला एका ऑर्डरसाठी 6,000 रुपयांची टिप दिली गेली.

आरोग्यदायी खाद्यपदार्थ (हेल्दी फूड) सर्च करण्याचे प्रमाण यंदाच्या वर्षी दुप्पटीने वाढले आहे. अशा प्रकारच्या रेस्टॉरंटच्या ऑर्डरमध्ये 200% वाढ दिसून आली आहे.