मुंबई : एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनिकरण करण्यात यावं, या मागणीसाठी गेल्या महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून कर्मचारी संपावर आहेत. या संपाबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीतूनही एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी ही 5 जानेवारी 2022 रोजी पार पडणार आहे. सुनावणीनंतर वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबतची माहिती दिली.

एसटी कर्मचारी मानसिक दबावाखाली

दरम्यान एसटी कर्मचारी हे मानसिक दबावाखाली आहेत. तसेच एकूण 48 हजार कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचंही सदावर्ते यांनी स्पष्ट केलं.

न्यायालयात काय झालं?

अधिक वाचा  'ग्लोबल टीचर' डिसले यांच्या रजेवर अंकुश; योगदान तपासणीचा निर्णय

आम्ही संपकरी नाहीत आम्ही दुखवट्यात आहोत. कर्मचारी आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहेत. मृत्यूनंतर दुखवटा होणे हे बरोबर आहे मात्र तो अनिश्चित काळाचा असतो यावर सदावर्ते यांनी युक्तिवाद करत 90 दिवसाचा असतो आणि आजच एकाचा मृत्यू झाला आहे यावर कोर्टाने अनिश्चित काळ असे नक्की केले.

विद्यार्थी शाळेत आणि कॉलेजला जाण्यासाठी एस टी नसल्याने त्यांना खाजगी गाड्यातून जावे लागत आहे , त्यात खासगी गाडया अधिक मोबदला घेत आहेत. 65 लाख प्रवासी आहेत. त्यातील 25 टक्के म्हणजे 12. 5 लाख विद्यार्थी शाळेतील आणि कॉलेज मधील विद्यार्थी आहेत.

अधिक वाचा  कर्वेनगर DP रस्ता मधोमध रेडिमिक्स प्लान्ट; अपघाताचे प्रमाण वाढले

बस सुरू नाहीत मात्र सुट्टी असल्याने त्यांना त्रास होणार नाही , नाताळ सुट्टी मध्ये विद्यार्थ्यांना त्रास होणार नसला तरी सामान्य प्रवाशांना त्रास होणार आहेत त्यात रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आहेत