एका ऑटोवाल्यानं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तरुणीनं धावत्या ऑटोतून उडी घेतली. ही घटना राजधानी दिल्लीजवळच्या गुरुग्राम शहरात घडली. या तरुणीनं ट्विटरवर या घटनेची माहिती दिलीय. तरुणीने ट्वीटमध्ये एका ऑटोरिक्षा चालकाने तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख केला आहे. बचावासाठी आपण धावत्या ऑटोरिक्षातून उडी मारली आणि ही घटना तिच्या घरापासून अवघ्या सात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या गुरुग्रामच्या सेक्टर २२ मध्ये घडली, असं या मुलीनं सांगितलंय.

कम्युनिकेशन स्पेशालिस्ट म्हणून काम करणार्‍या निष्ठाने ट्वीटमध्ये ऑटोरिक्षा चालकावर आरोप केले आहेत. तिच्या मते चालकाने जाणूनबुजून चुकीचा टर्न घेतला आणि अज्ञात रस्त्यावर गाडी चालवत राहिला. आपण विरोध केल्यानंतरही ऑटोरिक्षा चालकाने कोणताच प्रतिसाद दिला नाही, असं तिचं म्हणणं आहे.

अधिक वाचा  डिसले गुरुजींचा परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा; शिक्षणमंत्र्यांचे सीईओंना निर्देश

“काल माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक दिवसांपैकी एक होता, कारण मला वाटतं, माझं जवळजवळ अपहरण झालं होतं. ते काय होतं ते मला माहीत नाही, पण ते आठवलं तरी माझ्या अंगावर काटे येत आहेत. दुपारी साडे बाराच्या सुमारास, मी माझ्या घरापासून सात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सेक्टर २२ च्या गजबजलेल्या मार्केटमधून घरी जाण्यासाठी ऑटो घेतला. मी ऑटोवाल्याला सांगितलं की माझ्याकडे रोख रक्कम नाहीये त्यामुळे मी पेटीएमद्वारे पैसे देईन. तो चालक उबेरसाठी ऑटो चालवतो, असे त्याला पाहून वाटत होते. त्याने होकार दिला आणि मी ऑटोत बसले. त्यावेळी तो मोठ्या आवाजात भजन ऐकत होता.”

अधिक वाचा  इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार- नरेंद्र मोदी

निष्ठा पुढे सांगते, “आम्ही एका टी-पॉईंटवर पोहोचलो, तिथून माझ्या घरी जायला उजवीकडे वळायचे होते, पण तो डावीकडे वळला. मी त्याला विचारले, तू डावीकडे का वळतो आहेस. पण त्याने ऐकले नाही, आणि तो जोरात देवाचे नाव घेऊ लागला. (मी धर्माचा उल्लेख करू इच्छित नाही, कारण या घटनेचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही).”

“एका क्षणानंतर मी खरंच ओरडले. माझं सेक्टर उजवीकडे होतं, तुम्ही डावीकडे का नेत आहात, असं विचारलं पण त्याने उत्तर दिले नाही आणि मोठ्याने देवाचे नाव घेत राहिला. मी त्याच्या खांद्यावर ८-१० वेळा मारले, पण काहीही फायदा झाला नाही. त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार आला, बाहेर उडी मार. रिक्षा ३५.४० किलोमीटर प्रति तास वेगाने जात होती. त्याने रिक्षाची स्पीड वाढवण्यापूर्वी माझ्याकडे उडी मारण्याशिवाय पर्याय नव्हता. मला वाटलं, अपहरण होण्यापेक्षा हाडं मोडलेली कधीही चांगली… आणि मी धावत्या ऑटोतून उडी मारली. मला माहीत नाही. माझ्यात ही हिंमत कुठून आली…” असं निष्ठा सांगते.

अधिक वाचा  पंतप्रधान मोदी ठरले जगातील सर्वाधिक Rating असलेले लोकप्रिय नेते

दरम्यान, या प्रकरणी गुडगावच्या पालम विहारचे पोलीस अधिकारी जितेंद्र यादव यांनी सांगितले की ते लवकरच ऑटोरिक्षा चालकाचा शोध घेतील. त्यासाठी पोलीस त्या भागात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची मदत घेणार आहेत.