वारजेतील डुक्कर खिंड, तिरुपतीनगर पुढे दुधाने लॉन्सला जोडणाऱ्या डीपी रोडचे काम लवकरचं पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. तसेच तिरुपतीनगर ते मिलेनियम स्कुल तसेच पुढे मिर्च मसाला हॅाटेल,पृथ्वी हॅाटेल कडे जाणारा रस्ता सुध्दा प्रगतीपथावर आहे. नगरसेवक राजाभाऊ बराटे यांच्या माध्यमातून ही जागा 3 वर्षांपूर्वी ताब्यात घेऊन तिथे आतापर्यंत झालेला डीपी रस्त्याचे काम करण्यात आले आहे.

आज नगरसेवक राजाभाऊ बराटे यांच्या समवेत माजी नगरसेवक किरण बारटक्के व महापालिकेचे रस्ता विभागाचे प्रमुख विजय कुलकर्णी साहेब, अभिजीत डोंबे साहेब,महेश झोमण तसेच जागा मिळकतधारक यांना सोबत घेऊन रस्त्याची पाहणी केली. महापालिका अधिकाऱ्यांनी अडचणी जाणून घेत लवकरचं समस्या सोडवून नागरिकांचा सेवेत हा रस्ता सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.

अधिक वाचा  संक्रांतीनिमित्त १ कोटी लोक घालणार सूर्यनमस्कार

वारजेतील तिरुपती नगर, शनी मंदीर, सपना सोसायटी पासून हा रस्ता जाणार आहे, नक्कीच वारजे माळवाडीतील रहदारीचा  प्रश्न जो ऐरणीवर होता, तो या रस्त्यामुळे लवकर सुटेल व नागरिक ही सुरक्षितरित्या प्रवास करू शकतील. विश्वास भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक राजाभाऊ बराटे व माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी व्यक्त केला.